Pune : उत्तमनगर पोलीस ठाण्यातील एक पोलीस उपनिरीक्षकासह पोलीस हवालदार एसीबीच्या जाळ्यात

एमपीसी न्यूज – बारा हजाराची लाच स्वीकारताना उत्तमनगर पोलीस ठाण्यातील एक पोलीस उपनिरीक्षक पुणे लाचलुचपत प्रतिबंधक विभागा (एसीबी)च्या अधिकाऱ्यांनी पकडले. या कारवाई दरम्यान पोलीस हवालदार बाहेर पळाला. आज दुपारी साडेतीन वाजता हि कारवाई करण्यात आली.

कृष्णराव पुंडलिक कांबळे (पोलीस उपनिरीक्षक, नेमणूक: उत्तमनगर पोलीस ठाणे, पुणे शहर आयुक्तालय (वर्ग २ ब) रा. सर्वे न. ३/१६ब, गोविंदराव पाटील नगर, धनकवडी पुणे) आणि उमेश पुरुषोत्तम सूर्यवंशी (पोलीस हवालदार,बक्कल न. २४१४, नेमणूक :उत्तमनगर पोलीस ठाणे पुणे शहर आयुक्तालय रा.म बिल्डिंग न १३ ,रूम न १२ पोलीस लाईन वाकड,पुणे) असे लाचखोरांचे नाव आहे.

_MPC_DIR_MPU_II
  • याप्रकरणी ३५ वर्षे पुरुषाने व्यक्तीने पुण्यातील लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार दाखल केली होती.

दाखल तक्रारीनुसार, पुण्यातील लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने पडताळणी केली असता, तक्रारदार यांच्यावरील IPC 324 प्रमाणे दाखल असलेल्या गुन्ह्याचे पुरवणी चार्जशीट लवकर पाठवाण्यासाठी संशयित आरोपी यांनी बारा हजार रुपये लाचेची मागणी केली. तसेच बारा हजाराची लाच संशयित आरोपी पोलीस उपनिरिक्षक कांबळे यांनी ऊत्तमनगर पोलीस स्टेशन येथे स्विकारले असता त्यांना रंगेहात पकडण्यात आले आहे. आज दुपारी साडेतीन वाजता हि कारवाई करण्यात आली.

  • या कारवाईसाठी ण्यातील लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने सापळा पथकासाठी पोलीस उपअधीक्षक सीमा मेहेंदळे, पोलीस निरीक्षक चंद्रकांत चौधरी, पोलीस हवालदार नंदलाल गायकवाड, सपोफौ करुणाकर, पोलीस नाईक विनोद झगडे, नवनाथ माळी यांची नेमणूक केली होती.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.