Pune : जिल्हा परिषद अध्यक्ष, उपाध्यक्ष पदासाठी इच्छुकांच्या अजित पवार घेणार मुलाखती

एमपीसी न्यूज – पुणे जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष-उपाध्यक्ष पदासाठी इच्छुक असलेल्या सदस्यांच्या मुलाखती उपमुख्यमंत्री अजित पवार घेणार आहेत. शुक्रवारी (दि. 10 जानेवारी) जिल्हा परिषद शासकीय निवासस्थानी या मुलाखती होणार आहेत.

अध्यक्ष, उपाध्यक्ष, विषय समित्यांच्या सभापती पदासाठी इच्छुक असणाऱ्या सदस्यांनी उपस्थित राहण्याचे आवाहन राष्ट्रवादीतर्फे करण्यात आले आहे. वरील पदासाठी इच्छुक असणाऱ्या सदस्यांचे यापूर्वीच अर्ज मागविले आहे. अध्यक्षपद सर्वसाधारण प्रवर्गातील महिलांसाठी राखीव आहे.

या पदासाठी हवेली तालुक्यातील कीर्ती कांचन, अर्चना कामठे, अनिता इंगळे, आंबेगाव तालुक्यातील तुलसी भोर, मावळ तालुक्यातील शोभा कदम यांची नावे चर्चेत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.