Pune : आयपीएचतर्फे बुधवारी नैराश्य व चिंता स्वमदत गटाचे आयोजन

एमपीसी न्यूज- इन्स्टिट्यूट फॉर सायकॉलॉजीकल हेल्थ (IPH) यांच्या वतीने बुधवारी (दि 17) संध्याकाळी 6 ते ८ या वेळेत वाजता नैराश्य व चिंता स्वमदत गटाचे आयोजन करण्यात आले आहे.

प्रत्येक महिन्याच्या तिसऱ्या बुधवारी नैराश्य व चिंता स्वमदत गटाचे आयोजन करण्यात येते. या बुधवारच्या स्वमदत गटाचा विषय आहे चिंता, नैराश्य आणि सजगता.

इन्स्टिट्यूट फॉर सायकॉलॉजीकल हेल्थ, 4, यशश्री कॉलनी, वेदांत नगरी जवळ, कमिन्स कॉलेज रोड, कर्वेनगर, पुणे (खुणेसाठी – राजाराम पुलाकडून कमिन्स कॉलेजकडे जाणाऱ्या रस्त्यावर चांदणी हॉटेलच्या समोरची गल्ली. आत शिरल्यावर उजवीकडे चौथा बंगला ) या ठिकाणी हा स्वमदत गट होणार आहे.

या गटातला सहभाग विनामूल्य असून जास्तीतजास्त संख्येने या स्वमदत गटाचा लाभ घ्यावा असे आवाहन करण्यात आले आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.