Pune: कोरोना योद्ध्यांचा ‘आयएसए’तर्फे सन्मान

Pune: ISA honors Corona Warriors कोरोनामुळे देशभरात लॉकडाऊन करण्यात आले होते. या काळात डॉक्टर, पोलीस, आरोग्य कर्मचारी जीवाची बाजी लावून लढा देत आहेत.

एमपीसी न्यूज- कोरोनाच्या संकटकाळात समाजातील पीडित घटकांना आपल्या कार्यातून, सेवेतून दिलासा देणाऱ्या कोरोना योद्ध्यांना इंडियन स्पोर्ट्स असोसिएशनतर्फे (आयएसए) प्रमाणपत्र देऊन सन्मानित करण्यात आले.

मुकुल माधव फाउंडेशनच्या व्यवस्थापकीय विश्वस्त रितू छाब्रिया, होप फाउंडेशनच्या अध्यक्षा अरुणा कटारा, साहिल केदारी, डॉ. बंटी धर्मा, डॉ. पीटर दलवानी, सिंध की पुकारचे संपादक विनोद रोहानी, अमृत केदारी, कुमार शिंदे, जितू अडवाणी, दिनेश दोडाणी, दिनेश होले, महेश सुखरामानी, श्याम पंजवानी, रोहित महाजन, विकास भांबुरे, ज्योती मलकानी आदीचा उल्लेखनीय कार्याबद्दल गौरव करण्यात आला.

याप्रसंगी असोसिएशनचे अध्यक्ष सुरेश हेमनानी म्हणाले, कोरोनामुळे देशभरात लॉकडाऊन करण्यात आले होते. या काळात डॉक्टर, पोलीस, आरोग्य कर्मचारी जीवाची बाजी लावून लढा देत आहेत.

त्यासोबतच समाजातील अनेक संस्था, व्यक्ती लॉकडाऊनमुळे पीडित लोकांना दिलासा देण्यासाठी झोकून देऊन काम करीत आहेत. त्यांच्या कार्याचा उचित गौरव व्हावा, तसेच त्यांच्यापासून इतरांना प्रेरणा मिळावी, यासाठी संस्थेतर्फे या कोरोना योद्ध्यांचा सन्मान करण्यात आला आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.