Pune : जेजुरी गडावरील अतिक्रमण हटवा

माहिती अधिकार कार्यकर्ते प्रदीप नाईक यांची जिल्हाधिकाऱ्यांकडे मागणी

एमपीसी न्यूज – महाराष्ट्रातील प्रमुख धार्मिक स्थळांपैकी एक असलेले जेजुरी येथील गडावर अतिक्रमण वाढले आहे. वाढलेले अतिक्रमण काढण्याची मागणी माहिती अधिकार कार्यकर्ते (Pune) प्रदीप नाईक यांनी केली. नाईक यांनी याबाबत जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांना निवेदन दिले.

नाईक यांनी दिलेल्या निवेदनात म्हटले आहे कि, महाराष्ट्राचे आराध्य दैवत श्री क्षेत्र जेजुरी येथील गडावर अनेक वर्षापासून सेवेकरी जाऊन सेवा करतात. मागील अनेक वर्षापासून गड अतिक्रमणाच्या विळख्यात अडकलेला आहे. गडावर अनेकजण उदरनिर्वाह करण्यासाठी अनेक प्रकारचे स्टॉल लावत आहेत. तसेच खाद्य विक्रीचे स्टॉल लावत आहेत. तेथे फोटो काढण्याकरीता देखील अनधिकृतपणे लोक उभे असतात. जेजुरी गड महाराष्ट्राची ओळख असून तेथे अनेकवेळा शासनाने कारवाया केल्या. पण तरीही गडावरील अतिक्रमण वाढत आहे.

AIMIM : पिंपरी चौकात अशोकस्तंभ उभारा

यामध्ये शासनाने गांभिर्याने लक्ष घालणे गरजेचे आहे. गडावरील अतिक्रमण तत्काळ हटवून तिथल्या व्यावसायिकांना शासनाने परवाने द्यावेत. (Pune) आंध्रप्रदेश येथील तिरुपती देवस्थानाचा आदर्श महाराष्ट्र शासनाने घेऊन राज्यातील सर्व देवस्थानांच्या ठिकाणी आदर्श व्यवस्था करावी. धर्मादाय आयुक्तांनी तोंडी फतवा काढून मंदिरात पाच व्यक्तींना प्रवेश देऊन अभिषेक करावा. यामुळे हिंदू समाजाच्या भावना दुखावण्याची शक्यता आहे. इतर समाजातील धार्मिक स्थळांवर देखील अशा प्रकारचे नियम लावावेत.

गडावरील सर्व अतिक्रमण काढून गडाला मोकळा श्वास द्यावा. गड परिसरातून रुग्णवाहिका जाण्यासाठी योग्य सोय करावी. वाहनांच्या पार्किंगच्या ठिकाणी प्रत्येक वाहन चालकाकडून पैसे घेतले जातात. याचा हिशोब देण्यात यावा, असेही निवेदनात म्हटले आहे.

 

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.