Pune : भवानी पेठेतील कार्विंग कारखान्याला आग

एमपीसी न्यूज-  भवानी पेठ क्रांती तरुण मंडळाच्या शेजारी असलेल्या एका कार्विंग कंपनीला आज, बुधवारी सकाळी सव्वासहाच्या सुमारास आग लागून मोठे नुकसान झाले.

घटनेची माहिती मिळताच भवानी पेठेतील मुख्य अग्निशमन केंद्रामधून एक बंब आणि एक टँकर घटनास्थळी दाखल झाला. काही वेळातच आगीवर नियंत्रण मिळवण्यात आल्यामुळे मोठी दुर्घटना टळली. शॉर्टसर्किटमुळे ही आग लागल्याचा प्राथमिक अंदाज आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.