BNR-HDR-TOP-Mobile

Pune : प्रियकराने ऐनवेळी लग्नास नकार दिल्याने संगणक अभियंता तरुणीची आत्महत्या

एमपीसी न्यूज- प्रियकराने ऐनवेळी लग्नास नकार दिल्याने आलेल्या नैराश्यातून संगणक अभियंता तरुणीने आत्महत्या केल्याचा प्रकार फुरसुंगीत घडल्याचे उघडकीस आले.

याप्रकरणी हडपसर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला असून प्रियकर सचिन काशीद (वय 29) याला अटक केली. श्वेता बिस्वास (वय 29) असे आत्महत्या केलेल्या तरुणीचे नाव आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी आणि मृत तरुणी दोघेही संगणक अभियंता आहेत. मागील तीन वर्षांपासून त्यांच्यात प्रेमसंबंध होते. परंतु काही दिवसांपूर्वी आरोपी सचिन काशीद लग्नासाठी मुलगी पाहण्यास गेला आणि त्याने ती मुलगी पसंतही केली होती. यादरम्यान त्याने श्वेता बिस्वास हिच्याशी लग्न करण्यास नकार दिला. याच नैराश्यातून श्वेता बिस्वास हिने 27 फेब्रुवारी रोजी राहत्या घरी गळफास लावून आत्महत्या केली. पोलिसांनी याप्रकरणी गुन्हा दाखल केला असून आरोपीला अटक केली आहे

HB_POST_END_FTR-A2

HB_POST_END_FTR-A3