Pune : कात्रज प्राणिसंग्रहालयातून पसार झाला बिबट्या ; 24 तास उलटले तरी शोध मोहीम सुरू

एमपीसी न्यूज – कात्रज येथील राजीव गांधी प्राणिसंग्रहालयातून नर जातीचा ( Pune) बिबट्या काल   ( दि. 04 )  पसार झाला होता.या बिबट्याला   विलगीकरण कक्षातील पिंजऱ्यात ठेवण्यात आले होते.तेथून तो पळाल्याची माहिती कर्मचाऱ्यांकडून देण्यात आली. तो प्राणीसंग्रहालयाच्या आवारातच  असून  अद्याप त्याला जेरबंद करण्यात य़श आले नाही.     

कात्रज येथील प्राणिसंग्रहालयात विविध प्रकारचे प्राणी आढळतात. काही दिवसांपूर्वी त्यामध्ये चौशिंगे, तरस आणि बिबट्या या प्राण्यांची भर पडली होती. या प्राणिसंग्रहालयात चार बिबटे असून, त्यातील तीन मादी आहेत.   हा पसार झालेला  बिबट्या कर्नाटकमधील हंपी येथील अटलबिहारी वाजपेयी प्राणिसंग्रहालयातून आणण्यात आला होता. प्राण्यांच्या अनाथालयात काही दिवसांपासून त्याला विलगीकरणात ठेवण्यात आले होते. मात्र, सोमवारी सकाळी साधारणतः साडेनऊ वाजण्याच्या सुमारास पिंजऱ्यामध्ये बिबट्या नसल्याचे कर्मचाऱ्यांच्या लक्षात आले.

पिंजऱ्याच्या वरच्या बाजूची सळई उचकटून तो प्रसार झाल्याचे प्रथमदर्शनी दिसत असल्याचे प्राणी संग्रहालयाचे संचालक राजकुमार जाधव यांनी सांगितले. बिबट्या पसार झाल्याचे लक्षात आल्यानंतर तो पसार झालेला भाग पर्यटकांसाठी बंद ठेवण्यात आला. मात्र, पूर्ण प्राणी संग्रहालय बंद करण्यात आले नव्हते.

Today’s Horoscope 05 March 2024 – जाणून घ्या आजचे राशिभविष्य

 

बिबट्याला शोधण्यासाठी अग्निशमन दलासह विविध पथके तैनात करण्यात आले आहे.  24 तास उलटले शोधू मोहीम अजूनही सुरू आहे.

 

काल सकाळी विलगीकरण ठिकाणी ठेवण्यात आलेला हा बिबट्या असून त्याचा शोध घेण्यासाठी प्रयत्न काल रात्री पासून सुरू आहे. आज सकाळी काही ठसे त्याचे मिळून आले असून त्याचा शोध घेण्यासाठी वन विभाग, रेस्क्यू टीम, अग्निशमन दल यासारख्या विविध पथके तैनात करण्यात आले आहेत. तसचं या ठिकाणी ड्रोनची सुद्धा मदत घेतली जाईल. जोपर्यंत बिबट्या मिळत नाही तोपर्यंत प्राणी संग्रहालय बंद राहील. 

  राजकुमार जाधव  ,मुख्य अधिकारी, राजीव गांधी प्राणी संग्रहालय.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.