Talegaon Dabhade : नूतन महाराष्ट्र अभियांत्रिकी मध्ये निर्भय कन्या अभियान संपन्न

एमपीसी न्यूज – नूतन महाराष्ट्र विद्या प्रसारक मंडळ संचालित नूतन ( Talegaon Dabhade) महाराष्ट्र अभियांत्रिकी मध्ये सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ अंतर्गत निर्भय कन्या अभियान हा उपक्रम पार पडला. महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध करिअर तज्ज्ञ प्रा.विजय नवले यांनी महिलांचे सबलीकरण या विषयावर मार्गदर्शन केले. महिलांच्या निर्णय प्रक्रियेतील स्थानामुळे महिला आत्मनिर्भर झाल्या असल्याचे नवले यांनी सांगितले.

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या निर्भय कन्या अभियानात प्रा. नवले बोलत होते.”महिलांनी आज सर्व क्षेत्रांमध्ये भरारी घेतली आहे. चिकाटी आणि  कष्टाळू वृत्ती यामुळे महिलांनी शिक्षण,आरोग्य,कला,शासकीय नोकरी,व्यवसाय,बँकिंग,सेवा क्षेत्र, संगणक,विज्ञान,अभियांत्रिकी अशा विविध कार्यक्षेत्रांमध्ये उल्लेखनीय कामगिरी केली आहे.

जीवनाच्या सर्वच क्षेत्रांत महिला सन्मानाने कार्यरत आहे. संशोधनापासून संरक्षक दलापर्यंत आणि प्रशासनापासून  पायलट पर्यंत महिला अनेक क्षेत्रे पादाक्रांत करीत आहेत.तरीही दुर्दैवाने केवळ महिला आहे म्हणून कुठे अन्याय होत असेल तर तो दूर होण्याची आणि अजून तिला सन्मान देण्याची,तिला सुरक्षित वातावरण देण्याची समाजाची जबाबदारी आहे.लवकरच असे अपेक्षित सबलीकरण होईल”, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली. उपस्थित विद्यार्थिनींना त्यांनी आजची आव्हाने आणि त्यासाठीची सक्षमपणे तयारी कशी करावी याविषयी मार्गदर्शन केले.

Pune : कात्रज प्राणिसंग्रहालयातून पसार झाला होता बिबट्या ; 12 तासानंतर प्राणीसंग्रहालयाच्या आवारातच आढळला

‘महिलांचे समाजातील स्थान हे सर्वोच्च आहे.परंतु शिक्षण, व्यावसायिक जगातील तिचे पाऊल आणि निर्णय प्रक्रियेतील स्थान यांमुळे आधुनिक काळातील महिला अधिक आत्मनिर्भर झाली आहे.अर्थात  अजून मोठा पल्ला गाठावा लागेल , तेव्हा कुठे महिलांचे सबलीकरण खऱ्या अर्थाने होईल.परंतु चित्र आशादायक आहे,”असे प्रतिपादन करिअर तज्ज्ञ प्रा.विजय नवले यांनी व्यक्त केले.

पुढील सत्रामध्ये विद्यार्थिनींना महिला आरोग्य या विषयावर डॉ.अश्विनी पवार यांनी महिलांच्या आरोग्यासाठी समतोल आहाराचे महत्त्व, शारीरिक ऊर्जा, हार्मोनल संतुलन,निरोगी पौष्टिक आहार आदी बाबींनविषयी विद्यार्थिनीने मार्गदर्शन केले

कार्यक्रमासाठी नूतन महाराष्ट्र अभियांत्रिकीचे प्राचार्य डॉ. विलास देवतारे, विद्यार्थी विकास अधिकारी प्रा.जावेद शेख, प्रथम वर्ष विभागप्रमुख डॉ.शेखर रहाणे यांचे मार्गदर्शन लाभले.कार्यक्रमाचे नियोजन प्रा. सुनीता येवले, प्रा. सारिका पाटील तसेच अंकिता डोके, वैष्णवी नरळे, श्रद्धा येवले, रुपाली गवळी या विद्यार्थिनी ( Talegaon Dabhade) केले.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.