Today’s Horoscope 05 March 2024 – जाणून घ्या आजचे राशिभविष्य

एमपीसी न्यूज –  Today’s Horoscope 05 March 2024 – जाणून घ्या आजचे राशिभविष्य

आजचे पंचांग

आजचा दिवस – मंगळवार.

तारीख – 05.03.2024.

शुभाशुभ विचार – क्षयतिथी.

आज विशेष – श्री रामदास नवमी.

राहू काळ – दुपारी 3.00 ते 04.30.

दिशा शूल – उत्तरेस असेल.

आज नक्षत्र – मूळ 16.00 पर्यंत नंतर पूर्वा शाढा.

चंद्र राशी – धनु.

—————————–

मेष – ( शुभ रंग – पांढरा)

कार्यक्षेत्रात ध्येयप्राप्तीसाठी अथक परिश्रम करण्याची तयारी ठेवावी लागेल. आपल्याच काही जुन्या तत्त्वांना मुरड घालावी लागेल  महत्त्वाच्या चर्चेत सुसंवाद साधा.

वृषभ – ( शुभ रंग- क्रीम)

आज मोठे आर्थिक व्यवहार सावधपणे करावेत. नाकासमोर चालणे हिताचे राहील. गैरवर्तनाने प्रतिष्ठा धोक्यात येऊ शकते. आज संध्याकाळी फक्त सत्संगाकडे पावले वळवणे हिताचे राहील.

मिथुन – ( शुभ रंग- हिरवा)

केवळ मोठेपणा घेण्यासाठी न झेपणाऱ्या जबाबदाऱ्या स्वीकारू नका. जोडीदाराच्या भावना जपण्याचा प्रयत्न आज कराल. नोकरदारांवर वरिष्ठांचा वरदहस्त राहील.

कर्क – ( शुभ रंग – पिस्ता)

आज तुम्ही काही आरोग्याच्या तक्रारींनी त्रस्त असाल. वेळीच डॉक्टरांचा सल्ला घ्या. आज वैवाहिक जीवनातील काही मतभेद संध्याकाळी निवळतील. येणी वसूल होतील.

सिंह – ( शुभ रंग – मरून )

आजारी व्यक्तींच्या प्रकृतीत चांगलीच सुधारणा दिसून येईल. वैवाहिक जीवनात काही जुन्या स्मृती मनाला आनंद देतील. प्रिय व्यक्तीस आज एखादी भेटवस्तू द्याल.

कन्या – ( शुभ रंग- आकाशी)

घरगुती लघुउद्योग तेजीत चालतील. आज गृहिणी घर सजावटीवर भर देतील. कलाकारांना प्रयत्न वाढवावे लागणार आहेत. आज आईच्या तब्येतीची विचारपूस करा.

तूळ – ( शुभ रंग- चंदेरी)

वास्तु व वाहन खरेदी विक्रीचे व्यवहार आज टाळले तर बरे होईल. गृहिणींना आज माहेरची ओढ लागेल. विद्यार्थी आज अभ्यासापेक्षा खेळातच जास्त रमतील.

वृश्चिक – ( शुभरंग – जांभळा)

खिशात पैसा खेळता राहील. कमी कष्टात जास्त लाभ आज पदरात पडू शकतो. दुरावलेली काही नाती जवळ येतील. आज तुम्ही गोड बोलून आपल्या विरोधकांची ही मने जिंकाल.

धनु-  (शुभ रंग- भगवा)

आज महत्त्वाच्या चर्चेत तुम्ही आपल्याच मताशी ठाम राहाल. इतरांचे विचार पटणार नाहीत. अति स्पष्ट वक्तेपणामुळे काही आपलीच माणसे दुखावण्याची शक्यता आहे. वाद नकोत.

मकर – (शुभ रंग- स्ट्रॉबेरी)

काही जणांना आज तातडीचे प्रवास घडण्याची शक्यता आहे घरात थोरांच्या शब्दाला मान द्यावा लागेल आज प्रवासात खाण्यापिण्यावर ताबा असू द्या.

कुंभ – (शुभ रंग- डाळिंबी)

कार्यक्षेत्रात प्रगतीचा आलेख उंचावेल आर्थिक बाजू भक्कम असल्याने आज थोडी अनावश्यक खरेदी कराल. विरोधकही आज मैत्रीचा हात पुढे करतील.

मीन – ( शुभ रंग- क्रीम)

आज आळस झटकून कामाला लागाल. व्यवसायातील वाढत्या स्पर्धेला यशस्वीपणे तोंड द्याल. भावनेच्या भरात कोणालाही शब्द देऊ नका. मित्रांच्या फार नादी लागू नका.

श्री जयंत कुळकर्णी.

ज्योतिष व वास्तु शास्त्र सल्लागार.

फोन 9689165424

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.