Pune : 70 वर्षाच्या सुभद्राबाईनी दिली बिबट्याशी झुंज

एमपीसी न्यूज- आज सकाळी सात वाजण्याच्या सुमारास यांच्यासाठी काळ आला होता पण वेळ आली नव्हती या म्हणीचा प्रत्यय आला. सुभद्राबाई तारू सकाळी नेहमीप्रमाणे चुलीवर पाणी ठेवण्यासाठी घराबाहेर आल्या असता. घरासमोर बिबट्या बसला होता. सुभद्राबाईना प्रथम त्यांचा कुत्रा बसल्यासारखे वाटले म्हणून त्या पुढे गेल्या असता त्या बिबट्याने सुभद्राबाई यांच्यावर हल्ला केला. हा हल्ला त्यांनी कसा परतवून लावला हे त्याच्याच शब्दात…..

पुण्यातील मुंढवा-केशवनगर भागात आज सकाळी सात वाजण्याच्या सुमारास बिबट्या शिरल्याची घटना घडली. या घटनेमुळे केशवनगर भागात भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. अखेर बिबट्याला जेरबंद करण्यात वनविभागाच्या पथकाला यश आले. दरम्यान, बिबट्याने परिसरात चांगलीच दहशत निर्माण केली होती.

या घटनेत भोई वस्ती येथे राहणाऱ्या सुभद्राबाई तारू या सत्तर वर्षाच्या आजीने दाखवले धाडस कौतुकास पात्र ठरले आहे. एमपीसी न्यूजशी बोलताना सुभद्राबाई तारू यांनी संपूर्ण प्रकार कथन केला. सुभद्राबाई नेहमीप्रमाणे सकाळी उठल्यावर घराबाहेरील चुलीवर पाणी ठेवण्यासाठी बाहेर गेल्या होत्या. चुलीपासून काही अंतरावर घरातील कुत्रे झोपले असल्यासारखा त्यांना भास झाला. मात्र तो बिबट्या असल्याचे त्यांच्या नंतर लक्षात आले.

त्यानंतर त्या बिबट्याने सुभद्राबाई यांच्यावर हल्ला केला. या हल्ल्यात त्यांच्या डोक्याला आणि हाताला जखम झाली. सुभद्राबाईनी प्रसंगावधान राखून पाण्याने भरलेली बादली त्याच्याअंगावर ओतून बादली त्यांच्या तोंडावर मारली. त्यानंतर मोठ्याने ओरडून स्वतःची सुटका करून घेतली. आरडाओरडा ऐकून बिबट्या भिंतीवरून उडी मारून पसार झाला. या भागात सुभद्राबाई 40 वर्षांपासून राहत आहेत. इतक्या वर्षात इथे कधीही कोणताही वन्यप्राणी आला नाही. मात्र आज बिबट्या कसा आला याचे आश्चर्य त्यांना वाटले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.