Pune : महापारेषणची वीजवाहिनी तुटली; पर्यायी व्यवस्थेतून 65 हजार ग्राहकांचा वीजपुरवठा सुरळीत

एमपीसी न्यूज – महापारेषण कंपनीच्या 220 केव्ही टॉवर लाइनची दोनपैकी एक वीजवाहिनी तुटल्याने पिरंगुट 220  केव्ही व हिंजवडी 220 केव्ही उपकेंद्रांचा व पर्यायाने महावितरणच्या 20 वाहिन्यांचा वीजपुरवठा मंगळवारी (दि. 16) सकाळी 9.10 वाजता बंद पडला होता. मात्र युद्धपातळीवर पर्यायी वीजपुरवठ्याची व्यवस्था करून दुपारी 12.05  ते 3.36 वाजेपर्यंत टप्प्याटप्प्याने भुकूम (Pune), भूगाव, पिरंगुट, कोळवण खोरे, मुठा खोरे आदी मुळशी तालुक्यातील परिसरातील 45 गावांतील सुमारे 65 हजार वीजग्राहकांचा वीजपुरवठा पूर्ववत सुरू करण्यात आला.

याबाबत माहिती अशी की, कोकणातील रोहा येथून महापारेषणच्या कांदळगाव 220 केव्ही अतिउच्चदाब उपकेंद्रातून टॉवर लाइनद्वारे पिंरगुट व हिंजवडी येथील महापारेषणच्या 220 केव्ही अतिउच्चदाब उपकेंद्राला वीजपुरवठा करण्यात येतो. मात्र कांदळगाव 220 केव्ही टॉवर लाइनची एक वीजवाहिनी आंबेगाव (ता. मुळशी) येथे मंगळवारी (दि. 16) सकाळी 9.10 वाजताच्या सुमारास तुटली. त्यामुळे पिरंगुट व हिंजवडी अतिउच्चदाब उपकेंद्रांचा वीजपुरवठा बंद पडला. तर या उपकेंद्रांवर अवलंबून असलेले महावितरणच्या सुमारे 20 वीजवाहिन्यांचा वीजपुरवठा देखील खंडित झाला. यात 70 मेगावॅट विजेची पारेषण तूट निर्माण झाली. त्यामुळे मुळशी तालुक्यातील भूगाव, भूकूम पिरंगूट, बुरावडे, कोळवण खोरे, मुठा खोरे, पौड, माले, माण, मारूंजी, कासारसाई, नेरे, दत्तवाडी, हिंजवडीचा काही भागासह 45 गावांतील सुमारे 65 हजार वीजग्राहकांचा वीजपुरवठा खंडित झाला होता.

 

Pune : टॉवर लाईनची वीज वाहिनी तुटल्याने पिरंगुट व हिंजवडी उपकेंद्राचा वीजपुरवठा खंडित

सध्या तापलेल्या उन्हामुळे विजेची मागणी वाढल्याने 70 मेगावॅट विजेचे भार व्यवस्थापन करणे आव्हानात्मक होते. मात्र महापारेषण व महावितरणने संयुक्तपणे युद्धपातळीवर प्रयत्न करून खंडित झालेल्या (Pune) भागात दुपारी 12.05  मिनिटांनी पर्यायी स्वरुपात वीजपुरवठा उपलब्ध करून देण्यात सुरवात केली.

दुपारी 3.36 वाजेपर्यंत टप्प्याटप्प्याने सर्वच 45 गावांतील 65 हजार ग्राहकांचा वीजपुरवठा पूर्ववत करण्यात आला. दरम्यान महापारेषणकडून तुटलेल्या अतिउच्चदाब वीजवाहिनीच्या दुरूस्ती कामाला वेग देण्यात आला. यात आज दुपारी 3.25 वाजता तुटलेल्या वीजवाहिनीचे दुरुस्ती काम पूर्ण झाले. त्यानंतर महापारेषणची कांदळगाव 220 केव्ही अतिउच्चदाब वीजवाहिनी कार्यान्वित करण्यात आली व त्याद्वारे पिंरगुट व हिंजवडी येथील महापारेषणच्या 220 केव्ही अतिउच्चदाब उपकेंद्राचा वीजपुरवठा देखील पूर्ववत झाला.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.