Mulshi: मुळशीतील वीजपुरवठा उद्या सहा तास राहणार बंद,  ‘हे’ आहे कारण

एमपीसी न्यूज – महापारेषण कंपनीच्या पिरंगुट 220/22 केव्ही अतिउच्चदाब उपकेंद्रातील(Mulshi) पॉवर ट्रान्सफॉर्मरच्या दुरुस्तीच्या कामासाठी उद्या (रविवारी) सकाळी 8 ते दुपारी 2 वाजेपर्यंत मुळशी तालुक्यातील काही गावातील सुमारे 6 हजार ग्राहकांचा वीजपुरवठा बंद राहणार आहे.

याबाबत माहिती अशी की, महापारेषणच्या पिरंगुट 220/22 केव्ही उपकेंद्रातील 50 एमव्हीए  (Mulshi)क्षमतेच्या पॉवर ट्रान्सफॉर्मरमध्ये बिघाड आढळून आला आहे. त्याच्या दुरुस्तीचे काम रविवारी सकाळी सुरु करण्यात येणार आहे.

 

Talwade: बँक खाते फ्रीज झाल्याचा बहाणा करत व्यावसायीकाची  चार लाखाची फसवणूक

त्यासाठी या उपकेंद्रातून निघणाऱ्या महावितरणच्या पाच वीजवाहिन्यांचा वीजपुरवठा बंद ठेवावा लागणार आहे. यामध्ये 4 वीजवाहिन्या उच्चदाब वीजग्राहकांसाठी आहेत तर एका वीजवाहिनीवरून घोटावडे, भरे, रिहे, कातरखडक, पिंपोली, मुलखेड, खानेकर वस्ती, भेगडेवाडी, ओझरकरवाडी, आंधेले गाव, बोरकरवाडी, आमलेवाडी, मातरवाडी, पडळकरवाडी, लांडगेवाडी, केमसेवाडी, खांबोली, गोडंबीवाडी एक व दोन, शेळकेवाडी, देवकरवाडी आदी गावे व वाड्यावस्त्यांना वीजपुरवठा केला जातो.

 

त्यामुळे सुमारे 6 हजार लघुदाब व चार उच्चदाब ग्राहकांचा वीजपुरवठा रविवारी सकाळी 8 ते दुपारी 2 वाजेपर्यंत बंद ठेवण्यात येणार आहे. या कालावधीत सहकार्य करावे असे आवाहन महावितरण व महापारेषणकडून करण्यात आले आहे.

 

 

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.