Pune: वारजे सिप्ला हॉस्पिटल ते पुणे मनपा भवन pmpml बससेवेचा नागरिकांनी लाभ घ्यावा – दिपाली धुमाळ 

एमपीसी न्यूज – वारजे सिप्ला हॉस्पिटल ते पुणे मनपा भवन pmpml बससेवेचा (Pune)नागरिकांनी जास्तीत जास्त प्रमाणात लाभ घ्यावा, असे आवाहन पुणे महापालिकेच्या माजी विरोधी पक्षनेत्या दिपाली धुमाळ यांनी केले. 
माजी विरोधी पक्षनेत्या दीपाली धुमाळ, पुणे महापालिका शिक्षण मंडळाचे माजी अध्यक्ष बाबा धुमाळ यांच्या विशेष प्रयत्नातून वारजे सिप्ला हॉस्पिटल ते पुणे मनपा भवन PMPML बस सेवा आजपासुन सुरु करण्यात आली. याप्रसंगी PMPML चे अध्यक्ष डॉ. संजय कोलते, महादेव गायकवाड, सुरेश जाधव, दिवाकर पोफळे, राजाभाऊ ताकवले, नंदकुमार बोधाई, डी. के. जोशी, अनिल हिंगे, वि. दा पिंगळे यांच्या प्रमुख उपस्थितीत व इतर मान्यवर तसेच स्थानिक पदाधिकारी, जेष्ठ नागरिक, सोसायटीचे पदाधिकारी उपस्थित होते.

Bhosari : महिलांसाठी महिलांकडून महिला दिनानिमित्त महिलांचा ‘कीर्तन जागार’

गेले अनेक दिवस ही बससेवा बंद होती. त्या पार्श्वभूमीवर नागरिकांच्या सोयीसाठी ही बससेवा सुरू करण्यासाठी डॉ. कोलते यांना निवेदन देण्यात आले. आता ही बससेवा सुरू झाल्याने हॉस्पिटलमध्ये जाणे – येण्यासाठी नागरिकांना फायदेशीर होणार आहे, अशी माहिती बाबा धुमाळ यांनी दिली. तसेच वनाज मेट्रोपर्यंत शटल बस सुरू करावी, अशी मागणीही धुमाळ यांनी केली.
नागरिकांनी जास्तीत जास्त बसेसचा वापर करावा. उत्पन्न वाढले तर pmpml ला फायदा होणार आहे. या भागातून पुणे स्टेशन, स्वारगेट पर्यंत जाण्यासाठी छोट्या छोट्या बसेस उपलब्ध करून देऊ, अशी ग्वाही डॉ. संजय कोलते यांनी दिली.

 

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.