Pune MNS : सातारा येथील कार्यकर्त्यांचा पुण्यात मनसे पक्षात प्रवेश

एमपीसी न्यूज : शिवाजीराव बाळकृष्ण सुतार, मोहन अनंता सुतार, संदिप लक्ष्मण सुतार, हनुमंत दत्तू सुतार, संतोष अनंत सुतार, सुनिल शिवराम लोहार या कार्यकर्त्यांनी (Pune MNS) महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे महाराष्ट्र राज्य नेते अनिल शिदोरे, राजेंद्र (बाबू) वागसकर तसेच शहराध्यक्ष साईनाथ बाबर व प्रवक्ते योगेश खैरे यांच्या उपस्थितीत पुणे कार्यालयात महाराष्ट्र नवनिर्माण सेना या पक्षात प्रवेश केला.

Pimpri News: ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले यांना अभिवादन

या सहा जणांच्या नेतृत्वाखाली सातारा जिल्हयात काम करत असणाऱ्या शेकडो कार्यकर्त्यांचा येत्या काळात मनसे पक्षामध्ये प्रवेश होईल, असे मनोगत नवोदित महाराष्ट्र सैनिकांनी व्यक्त केले. यावेळी पक्षनिष्ठा व पक्षहितास याला प्राधान्य देत निरपेक्ष कार्यरत रहाण्याबाबत उपस्थितांना या सहा जणांनी आश्वासन दिले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.