Pune mobile theft : मोबाईल चोरणारी आंतरराज्य टोळी जेरबंद, 84 मोबाईल जप्त

एमपीसी न्यूज : सध्या गणेशोत्सव मोठ्या प्रमाणात साजरा होत असुन या सणानिमीत्त खरेदी व दर्शनाकरीता लोक मोठया प्रमाणात गर्दी करीत असतात.(Pune mobile theft) याच गर्दीचा फायदा घेवुन मोबाईल चोरी व पाकिट चोरीचे गुन्हे मोठया प्रमाणात घडण्याची शक्यता असल्याने अशा गुन्हयांना आळा घालण्यासाठी पोलिसांना वरिष्ठांकडून सूचना मिळाल्या होत्या.

दरम्यान सिंहगड पोलीस ठाण्यात दाखल गुन्ह्याचा तपास सुरू असताना पोलीस अंमलदार देवा चव्हाण यांना बातमीदाराकडुन बातमी मिळाली की, “मोबाईल चोरी करणारे तीन इसम फनटाईम थेअटरच्या मागील रोडवर थांबले आहेत.(Pune mobile theft) त्यांच्याकडे दोन काळ्या रंगाच्या बॅग असून त्यामध्ये चोरी केलेले मोबाईल आहेत” अशी खात्रीशिर माहिती मिळाली होती. त्यांनी वरिष्ठांना याची माहिती दिली.

वरिष्ठांनी खात्री करुन कारवाई करणेबाबतचे आदेश दिल्याने बातमीप्रमाणे खात्री केली असता, प्राप्त बातमीचे ठिकाणी तीन इसम उभे असल्याचे व त्याच्याकडे दोन बॅगा व त्यांचे हालचाली संशयास्पद वाटल्याने (Pune mobile theft) त्यांना सापळा रचुन ताब्यात घेत असताना त्याचे सोबत असणारा एक इसम पळुन जावु लागल्याने त्याला देखील लागलीच थोड्या अंतरावर पाठलाग करुन पकडण्यात आले.

Devendra fadnavis : मुद्रांक विभागाच्या कामकाजात मानवी हस्तक्षेप कमी करण्याचा प्रयत्न करा- देवेंद्र फडणवीस

नमुद संशयीत इसमांकडे त्याचे नाव पत्ता विचारता त्यांनी आपली नावे 1) शरथ मंजुनाथ, (वय 21 वर्षे, रा. हनुमंतनगर हौसमाने मारीअम्मा मंदीराजवळ, भद्रावती शिमोगा कर्नाटक, राज्य सध्या पुणे फिरस्ता) केशवा लिंगराजु (वय 24 वर्षे, रा. पहीला क्रॉस संते मंदीना, भोवी कॉलनी, भद्रावती शिमोगा, राज्य कर्नाटक, सध्या पुणे फिरस्ता, नवीन हनुमानथाप्पा, (वय १९ वर्षे, रा. पहीला क्रॉस उजव्या बाजुस डुडुकलांबा मंदीराजवळ भोवी कॉलनी हौसमाने भद्रावती शिमोगा राज्य कर्नाटक सध्या पुणे फिरस्ता) असे असल्याचे सांगितले.

त्याचेकडील बॅगांची पाहणी केली असता त्यात अॅपल, विवो, ओपो, सॅमसंग रेडमी, रिअलमी कंपनीचे एकुण 42 मोबाईल हँडसेट मिळुन आले. केशवा लिंगराजु याचे ताब्यातील बॅग मध्ये अॅपल, विवो ओपो, सॅमसंग, रेडमी, रिअलमी कंपनीचे एकुण 41 मोबाईल हँडसेट मिळुन आले 3) नवीन नुमानथाप्पा याचे पॅन्टच्या खिशामध्ये 1 सॅमसंग कंपनीचा मोबाईल फोन मिळुन आला.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.