Pune : फेसबुकवरून विवाहित महिलेचा विनयभंग; आरोपीविरोधात गुन्हा दाखल

Molestation of a married woman from Facebook; Filed a case against the accused ; घोडेगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल

एमपीसी न्यूज : एका विवाहित महिलेला फेसबुकवर मेसेज पाठवून तिच्याकडे शारीरिक सुखाची मागणी करत त्या महिलेचा विनयभंग करणाऱ्या अज्ञात आरोपी विरोधात पुणे जिल्ह्यातील घोडेगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. 

या प्रकरणी पीडित महिलेच्या पतीने  फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार पीडित महिला  आंबेगाव तालुक्यातील घोडेगाव येथील रहिवासी आहे.

12 ते 15 जुलै या कालावधीत अज्ञात आरोपीने या महिलेच्या फेसबुक मेसेंजरमध्ये अश्लील मेसेज पाठवले.

_MPC_DIR_MPU_II

या महिलेला ‘तू माझ्याशी बोलना, तू मला भेटायला येना, तू मला खूप आवडतेस’, असे मेसेज पाठवत शारीरिक सुखाची मागणी केली.

दरम्यान, तो दररोज अशा प्रकारचे मेसेज करू लागल्यामुळे पीडित महिलेने या सर्व घटनेची माहिती पतीला दिली.

त्यानंतर पतीने घोडेगाव पोलीस स्टेशनमध्ये धाव घेत   तक्रार दिली.  त्यानुसार  पोलिसांनी  अज्ञात आरोपी विरोधात गुन्हा दाखल केला आहे.

घोडेगाव पोलीस ठाण्याचे  पोलीस निरीक्षक प्रदीप पवार अधिक तपास  करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.