Pune : महाराष्ट्रात मान्सून दाखल, पावसाची प्रतीक्षा संपली

एमपीसी न्यूज – गेल्या कित्येक दिवसांपासून सर्वसामान्य नागरिक उन्हाच्या चटक्याने हैराण झाले आहेत. कधी एकदा पाऊस पडतो? असे सर्वांनाच वाटत होत. आता या पावसाची अर्थात मान्सूनची प्रतीक्षा संपली आहे. मान्सून महाराष्ट्रात दाखल झाला असून तो कोकण भागात पडत आहे.

महाराष्ट्रासह देशभरात उष्णतेची लाट पाहायला मिळत आहे. त्यामुळे अनेकजण पावसाची वाट पाहताना दिसत होते. दरम्यान अखेर केरळात मान्सून दाखल झाला होता. स्कायमेट या हवामान संस्थेने याबाबतची माहिती दिली होती.

  • स्कायमेटने दिलेल्या माहितीनुसार, कोणत्याही ठिकाणी मान्सून सक्रीय होण्यासाठी ओएलआर, वाऱ्याची अनुकूलता, पाऊस हे तीन घटक फार महत्त्वाचे असतात.

दरम्यान, 7 जूनला हे तीनही घटक सक्रीय झाल्यानंतर अखेर हवामान तज्ज्ञांनी केरळात मान्सून दाखल झाल्याची घोषणा केली होती. मात्र हाच मान्सून महाराष्ट्रात कधी दाखल होणार ? हा प्रश्न पडत होता. आता या पावसाची अर्थात मान्सूनची प्रतीक्षा संपली आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.