Pune : महापालिकेची सर्वसाधारण सभा सलग तिसऱ्या दिवशी तहकूब

एमपीसी न्यूज – ‘कोरोना’चा संकटामुळे पुणे महापालिकेची सर्वसाधारण सभा बुधवारी सलग तिसऱ्या दिवशी तहकूब करण्यात आली. ही सभा आता बुधवार (दि. 22 एप्रिल) दुपारी 3 वाजता होणार आहे.

सर्वसामान्य पुणेकरां बरोबरच सर्वोपक्षीय नागरसेवकांनीही कोरोनाचा धसका घेतला आहे. आज आयोजित केलेल्या सभेला काही मोजकेच नगरसेवक उपस्थित होते. सध्या कोरोनामुळे पुणे शहरातील रस्त्यांवर अघोषित संचारबंदीच आहे. व्यपार्यांनी दुकाने बंद ठेवली आहेत.

‘पीएमपीएमएल’मध्ये प्रवासी नाहीत. पुणेकरांनी स्वतःहून दक्ष राहून घरीच राहणे पसंत केले आहे. पुणे महापालिकेतर्फे कोरोना संदर्भात विविध उपाययोजना करण्यात येत आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.