Pune : मुस्लिम समाजाचा आढळराव यांना पाठिंबा

एमपीसी न्यूज – शिरूर लोकसभा मतदारसंघातील महायुतीचे उमेदवार शिवाजीराव आढळराव पाटील यांना भारतीय अल्पसंख्याक संघटना, महाराष्ट्र राज्य यांच्यावतीने पाठिंबा जाहीर करण्यात येत आहे, असे संघटनेचे संस्थापक अध्यक्ष ताहेर आसी यांनी म्हटले आहे.

याबाबत ताहेर आसी यांनी प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकामध्ये म्हटले आहे की, भारतीय अल्पसंख्याक संघटनेला अपेक्षित असलेली मूल्ये खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांच्यात दिसून येतात. जनतेच्या सुख-दुःखाची जाणीव असणारे, दूरदृष्टी ठेवून शहराच्या उन्नतीसाठी काम करणारे, सर्वांना सोबत घेऊन जाण्याचा प्रयत्न करणारे असे खासदार आढळराव यांचे व्यक्‍तीमत्व आहे. जाती-धर्माचा विचार न करणारा त्यांच्यासारखा नेताच समाजातील एकात्मता कायम राखेल याचा आम्हाला विश्‍वास आहे.

गेल्या 15 वर्षांत खासदार आढळराव पाटील यांनी अनेक मुस्लिम बांधवांना हज यात्रेला जाण्यासाठी संधी मिळवून दिली. त्याचबरोबर वैद्यकीय उपचारांसाठी, शाळेच्या प्रवेशासाठी मदत केली आहे. दिवस-रात्री कधीही फोन केला तर सहज उपलब्ध होणार खासदार म्हणून आढळराव यांची ओळख आहे. त्यामुळे खासदार आढळराव पाटील यांना बहुमताने विजयी करण्याचे आवाहन अध्यक्ष आसी आणि पुणे जिल्हाध्यक्ष रेश्‍मा हनीफ पठाण यांनी आपल्या समाजबांधवांना केले आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.