Pune : आयएमईडी ‘तर्फे ‘वर्कप्लेस डायव्हर्सिटी अँड क्रॉस कल्चरल इस्युज’ विषयावर राष्ट्रीय चर्चासत्र

एमपीसी न्यूज- भारती अभिमत विद्यापीठाच्या ‘ इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट अँड आंत्रप्रुनरशिप डेव्हलपमेंट (आयएमईडी )तर्फे ‘वर्कप्लेस डायव्हर्सिटी अँड क्रॉस कल्चरल इस्युज’ या विषयावर राष्ट्रीय चर्चासत्राचे 21 फेब्रुवारी रोजी आयोजन करण्यात आले आहे.

आयएमईडी च्या पौड रस्ता येथील कॅम्पस मध्ये हे राष्ट्रीय चर्चासत्र होणार आहे,अशी माहिती आयएमईडीचे संचालक आणि भारती विद्यापीठाच्या व्यवस्थापनशास्त्र शाखेचे अधिष्ठाता डॉ. सचिन वेर्णेकर यांनी दिली. मनुष्यबळ विकास विषयक चर्चा आणि संशोधन प्रबंध या चर्चासत्रात सादर केले जाणार आहेत. डॉ प्रवीण माने, डॉ हेमा मिरजी, शंतनू कर्णिक हे संयोजन करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.