Pune : राष्ट्रीय महामार्ग क्र. 4 हद्दीतील अतिक्रमण काढण्याचे आवाहन

एमपीसी न्यूज – भारतीय राष्ट्रीय राजमार्ग प्राधिकरण पुणे (Pune) यांच्या अधिकार क्षेत्रामधील  राष्ट्रीय महामार्गाच्या हद्दीमध्ये राष्ट्रीय महामार्ग क्र. 4 वरील नवीन कात्रज बोगदा ते वारजे दरम्यान दोन्ही बाजूच्या सेवा रस्त्यांवर असलेले अनाधिकृत अतिक्रमण काढण्याचे आवाहन प्राधिकरणातर्फे करण्यात आले आहे.

अतिक्रमणामुळे रा. म. क्र. 4 वरील अपघाताचे प्रमाण वाढले आहे. विभागीय आयुक्त पुणे, पोलीस आयुक्त पुणे शहर, आयुक्त पुणे महानगरपालिका व  प्राधिकरणाचे प्रकल्प संचालक यांच्या 21 नोव्हेंबर रोजी झालेल्या बैठकीत ठरल्यानुसार या सेवा रस्त्यावरील अतिक्रमण काढण्यास सुरुवात झाली आहे. त्यामुळे राष्ट्रीय महामार्गाच्या हद्दीमध्ये व दोन्ही बाजूच्या सेवा रस्त्यालगतच्या मिळकतधारकांनी अनधिकृतपणे केलेले अतिक्रमण व विना परवाना बांधकाम स्वखर्चाने त्वरीत काढून घ्यावे.

Pcmc Elecation: महापालिकेची नगरसेवक संख्या 128 च राहणार; तीनचे नव्हे चार नगरसेवकांचे ‘पॅनेल’

 राष्ट्रीय महामार्गाच्या हद्दीमध्ये नवीन कात्रज बोगदा ते वारजे (Pune) दरम्यान दोन्ही बाजूच्या सेवा रस्त्यांवर अस्तित्वातील असलेल्या सेवा वाहिन्या (पाणी पुरवठा, टेलीफोन, विद्युत वाहीनी, ओएफसी केबल्स इ.) संबंधित यंत्रणेने त्वरीत स्वखर्चाने काढून घ्याव्यात. अतिक्रमण काढताना काही नुकसान किंवा असुविधा झाल्यास भारतीय राष्ट्रीय राजमार्ग प्राधिकरण पुणे जबाबदार राहणार नाही याची नोंद घ्यावी.

सदर अतिक्रमण भारतीय राष्ट्रीय राजमार्ग प्राधिकरण पुणे यांच्यावतीने दि कन्ट्रोल ऑफ नॅशनल हायवेज (लॅन्ड अॅन्ड ट्राफिक) अॅक्ट 2002 अन्वये निष्कासीत करण्यात येतील व त्याचा खर्च व दंड संबधीत धारकाकडून वसूल करण्यात येईल, असे प्रकल्प संचालक एस. एस. कदम यांनी कळविले आहे

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.