Pune crime : परिचारकाने हॉस्पिटल मध्ये वापरल्या जाणाऱ्या औषधांचा उपयोग करून केला बायकोचा खून

एमपीसी न्यूज : परिचारकाने हॉस्पिटल मध्ये वापरल्या जाणाऱ्या औषधांचा उपयोग करून आपल्याच पत्नीचा खून केल्याची घटना पुण्यातील मुळशी तालुक्यात (Pune crime) असणाऱ्या मौजे कासार आंबोली येथे घडली. प्रियांका क्षेत्रे असे खून झालेल्या महिलेचे नाव आहे. स्वप्निल बिभिषण सावंत असे या आरोपीचे नाव असून पौड पोलिसांनी त्याला अटक केली आहे

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मुळशी तालुक्यात श्रध्दा हॉस्पिटल मध्ये स्वप्निल बिभिषण सावंत (23) हा परिचारक म्हणून काम करत होता. स्वप्नील चे प्रियांका क्षेत्रे (22) या मुलीशी काही महिन्यांपूर्वी लग्न झाले होते. मात्र त्यानंतर स्वप्नील चे दुसऱ्या मुलगी प्रियांका पटेल (परिचारीका ) हिच्या सोबत प्रेमसंबंध होते.

Pune News : पुणे पोलीस दलातील तीन कर्मचाऱ्यांचे लाजिरवाणे कृत्य, मद्यधुंद अवस्थेत हॉटेलमध्ये धिंगाणा

दुसरे लग्न करता यावे यासाठी त्याने पत्नी प्रियांका क्षेत्रे हिला जिवे ठार मारण्याचे ठरवले. तो काम करीत असलेल्या हॉस्पिटल मधुन त्याने घातक औषधे गपचुप राहत्या घरी नेत असे.(Pune crime) यासाठी त्याने बनाव रचून बायकोला तुझ डोकं दुखतंय म्हणत तिला डोके दुखणे कमी होण्यासाठी गोळ्या दिल्या तसेच ब्लड शुगर लेव्हल कमी व्हाव्या, BP (ब्लड प्रेशर) कमी व्हावा यासह भुलीचे इंजेक्शन चा वापर करत तिला हे सगळे औषध त्याने बळजबरीने दिले. प्रकृती बिकट होत गेल्याने प्रियांकाचा अखेर मृत्यू झाला. स्वप्नील ने संशय येऊ नये यासाठी प्रियांका ने आत्महत्या केली असल्याची एक चिठ्ठी देखील लिहून ठेवली.

पोलिसांना मात्र सावंत वर संशय आल्याने त्याच्याकडे चौकशी केली असता त्यानेच हा खून केल्याची काबुली दिली.पुढील तपास पौड पोलीस करत आहेत.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.