Pune News : पुणे पोलीस दलातील तीन कर्मचाऱ्यांचे लाजिरवाणे कृत्य, मद्यधुंद अवस्थेत हॉटेलमध्ये धिंगाणा

एमपीसी न्यूज : पुणे पोलीस दलात कार्यरत असणाऱ्या तीन पोलीस कर्मचाऱ्यांनी दारूच्या नशेत मुंढवा परिसरातील एका हॉटेलमध्ये धिंगाणा घातल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. आणखी दारू मिळावी यासाठी या कर्मचाऱ्यांनी हॉटेल मॅनेजर सोबत हुज्जत घालत त्याला मारहाणही केली.(Pune News) या तीनही पोलीस कर्मचाऱ्यावर आता गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सोमवारी मध्यरात्री हा सर्व प्रकार घडला.

पोलीस अंमलदार उमेश मरीस्वामी मठपती, अमित सुरेश जाधव आणि योगेश भगवान गायकवाड अशी या कर्मचाऱ्यांची नावे आहेत. याबाबत हॉटेल मॅनेजर कुनाल दशरथ मद्रे (27, रा. घोरपडीगाव) यांनी फिर्याद दिली आहे. याप्रकरणी मुंढवा पोलीस ठाण्यात मारहाण तसेच मुंबई दारूबंदी अधिनियमांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

PCMC Election : महापालिका निवडणुकीसाठी नव्याने प्रभागरचना करा; राज्य सरकारचा आयुक्तांना आदेश

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी हे मुलगा परिसरातील एका हॉटेलमध्ये मॅनेजर म्हणून काम करतात. सोमवारी रात्री एक वाजण्याच्या सुमारास दुकान बंद करत असताना हे तीनही पोलीस कर्मचारी त्या ठिकाणी आले. तिघांनीही बार काउंटरवर मद्य प्राशन केले.(Pune News) यानंतर आणखी दारूची मागणी केली. तसेच, शिवीगाळ करीत येथील रोहित काटकर याला हाताने मारहाण केली. एवढेच नाही तर मोठमोठ्या आवाजात धमकी देऊन हॉटेलमधील बार काऊंटरवर धिंगाना घातला. या तीनही पोलीस कर्मचाऱ्यांवर पुन्हा दाखल करण्यात आला असून अधिक तपास सुरू आहे.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.