PCMC Election : महापालिका निवडणुकीसाठी नव्याने प्रभागरचना करा; राज्य सरकारचा आयुक्तांना आदेश

एमपीसी न्यूज – आगामी पिंपरी-चिंचवड महापालिका निवडणुकीसाठी नव्याने प्रभागरचना तयार करण्याचे आदेश राज्याच्या नगरविकास विभागाने महापालिका आयुक्तांना दिले आहेत. (PCMC Election) सुधारित केलेल्या तरतूदीप्रमाणे प्रभाग रचना तयार करण्यास सांगितल्याने निवडणूक तीन सदस्यीय नव्हे तर चार सदस्यीय पद्धतीनेच होईल असे दिसते.

याबाबत नगरविकास विभागाच्या उप सचिव प्रियांका कुलकर्णी-छापवाले यांनी आज (मंगळवारी) आदेश महापालिका आयुक्तांना पाठविला आहे. त्यात म्हटले आहे की, मुंबई महानगरपालिका अधिनियम, 1888 व महाराष्ट्र महानगरपालिका अधिनियम, 1949 मध्ये संदर्भिय अधिनियमानुसार सुधारित केलेल्या तरतूदीप्रमाणे मुदत संपलेल्या आणि नजीकच्या कालावधीत मुदत संपत असलेल्या महानगरपालिकांच्या आगामी सार्वत्रिक निवडणुकीसाठी लगतच्या जनगणनेनुसार प्रभागांची संख्या/ रचना निश्चित करून प्रभाग रचनेच प्रारूप तयार करण्यासाठी आवश्यक ती कार्यवाही तात्काळ सुरू करण्यात यावी, असे आदेशात म्हटले आहे.\

Pimpri Ncp protest : महाराष्ट्राचा सातत्याने अपमान करणाऱ्यांचा कुटील डाव हाणून पाडणार – अजित गव्हाणे

अतिरिक्त आयुक्त जितेंद्र वाघ म्हणाले, प्रभाग रचना करण्याबाबत राज्य सरकारचे आदेश प्राप्त झाला आहे. पण, किती सदस्यीय पद्धतीने प्रभाग रचना करायची याचा बोध होत नाही. वरिष्ठांकडून माहिती घेण्यात येईल.

दरम्यान, राज्यातील तत्कालीन महाविकास आघाडी सरकारने पिंपरी-चिंचवड शहरातील लोकसंख्या तसेच नागरी विकास योजनांच्या वेगाची गरज लक्षात घेऊन वाढवलेली (PCMC Election) 11 नगरसेवक संख्या शिंदे-फडणवीस सरकारने रद्द केली आहे. त्यामुळे महापालिकेची नगरसेवक संख्या 128 च राहील आणि निवडणूक तीनसदस्यीय नव्हे तर चारसदस्यीय पद्धतीनेच होईल असे दिसते. कारण, आदेशात सुधारित केलेल्या तरतूदीप्रमाणे प्रभाग रचना तयार करावी असे म्हटले आहे.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.