Pune : शास्त्रज्ञ प्रदीप कुरूलकरांवर कारवाईच्या मागणीसाठी पुण्यात राष्ट्रवादी काँग्रेसचे आंदोलन 

एमपीसी न्यूज- डीआरडीओ (DRDO) चे वरीष्ठ शास्त्रज्ञ प्रदीप कुरुलकर यांनी पाकिस्तानच्या ‘पीआयओ’ला माहिती पुरविल्या प्रकरणी एटीएसने अटक केली.त्या घटनेमुळे देशभरात एकच खळबळ उडाली असून त्या पार्श्वभूमीवर आज पुणे शहराध्यक्ष प्रशांत जगताप यांच्या नेतृत्वाखाली प्रदीप कुरुलकर यांच्यावर कठोर कारवाई करण्यात यावी,यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसने आंदोलन  केले.यावेळी पाकिस्तानचा एजंट कोण ‘आरएसएस’चा स्वयंसेवक,संस्कार भारती आणि ‘आरएसएस’ची हीच का शिकवण अशा घोषणा देखील (Pune) देण्यात आल्या.
यावेळी प्रशांत जगताप म्हणाले की, विरोधी पक्षातील एखाद्या नेत्याने विधान केल्यावर सत्ताधारी भाजपकडून त्याच्यावर तात्काळ गुन्हा दाखल करून कारवाई केली जाते.पण मागील 40 वर्षापासून (DRDO) डीआरडीओ या संस्थेवर विविध पदावर शास्त्रज्ञ प्रदीप कुरुलकर यांनी काम पाहिले आहे.पण आता याच व्यक्तिने पाकिस्तानला माहिती पुरविल्याचे समोर आले असून प्रदीप कुरुलकर हे आरएसएसमध्ये देखील विविध पदावर काम केले आहे.

Pune : पुण्यातून 14 लाखांचे एमडी जप्त, 61 वर्षीय इसमाला अटक

त्यामुळे नेहमी इतरांना देश प्रेमाबद्दल आरएसएस कडून सांगितले जाते.पण याच शाखेत व्यक्तिने देशातील माहिती पाकिस्तानला पुरविली.त्यामुळे आरएसएस मध्ये हेच शिकवले जाते का ? त्यामुळे आम्हाला देश प्रेम आरएसएस, पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शाह यांनी शिकवू नये.आमच्या रक्तात देश प्रेम असून देशद्रोही प्रदीप कुरुलकर याच्यावर कठोर (Pune) कारवाई केंद्र सरकारने कारवाई अशी मागणी यावेळी त्यांनी केली.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.