Pune: नवीन 65 कन्टेनमेंट झोनची घोषणा, प्रतिबंधित क्षेत्राबाहेर विविध दुकाने, कार्यालये व व्यवसायांना परवानगी

Pune: New 65 containment zones announced, various shops, offices and businesses allowed outside the restricted area

एमपीसी न्यूज – कोरोना नियंत्रणासाठी पुणे महानगरपालिका आयुक्तांनी आज (मंगळवारी) रात्री नवीन महत्त्वपूर्ण आदेश काढला. त्यात शहरातील सुधारित 65 कन्टेनमेंट झोनची यादी जाहीर करण्यात आली आहे.  प्रतिबंधित क्षेत्राच्या बाहेर घरकाम करण्यास परवानगी देण्यात आली आहे. त्यासाठी घर मालकांची परवानगी मिळाल्यास स्वेच्छेने काम करता येणार आहे, असा महत्वपूर्ण आदेश मंगळवारी रात्री महापालिका आयुक्त शेखर गायकवाड यांनी दिला आहे. या आदेशामुळे प्रतिबंधित क्षेत्राच्या बाहेर अनेक प्रकारच्या व्यवसायांना काही अटींवर परवानगी देण्यात आली आहे. 

जेष्ठ नागरिकांना त्यांच्या मदतीकरिता लागणाऱ्या व्यक्ती, रुग्णसेवेसाठी मदतनीस, हेल्पर, घराकाम करणारी व्यक्ती, यांची मदत घेता येणार आहे. या व्यक्ती प्रतिबंधित क्षेत्राबाहेरीलच असाव्यात. सर्व शासकीय कार्यालयांमध्ये उपसचिव व त्यापेक्षा वरिष्ठ दर्जाचे सर्व अधिकारी कार्यालयात उपस्थित राहू शकतात. 33 टक्के कर्मचारी वापरून कार्यालये सुरू ठेवता येणार आहेत.

वर्तमानपत्रे,  वित्तीय क्षेत्र, ई – कॉमर्स, वाहन वापर, माहिती तंत्रज्ञान, खाद्य पदार्थांची सेवा, बांधकाम, पथारी व्यावसायिक, सुरक्षा व सेवा व्यवस्था संदर्भात आदेश देण्यात आले आहे.

कोरोनाचे 65 कंटेन्मेंट झोन करण्यात आले आहे. प्रतिबंधित क्षेत्रामध्ये दूध आणि भाजीपाला तसेच इतर अत्यावश्यक वस्तूंचा पुरवठा जसे स्वयंपाकाचा गॅस, पुणे महापालिका, पोलीस प्रशासन यांच्या मार्गदर्शनाखाली आणि स्थानिक परिस्थिती लक्षता घेऊन घरपोच देण्यात येणार आहे. किंवा मोकळ्या जागेवर सुरक्षित अंतराचे पालन करून देता येईल. या परिसरात जीवनावश्यक वस्तूंचा, औषध विक्रीची दुकाने, अत्यावश्यक सेवा पुरविणारे कार्यालये, व्यक्तींना आणि त्यांच्या वाहनांना सूट देण्यात आली आहे. प्रतिबंधित क्षेत्राबाहेरील दुकानांना वार ठरवून देण्यात आले आहेत.

पथारी व्यवसाय करण्यास परवानगी

पथारी व्यावसायिकांना सकाळी 7 ते सायंकाळी 7 या दरम्यान व्यवसाय करण्यास आयुक्तांनी परवानगी दिली आहे. शिवाजी रोड, बाजीराव रोड, शनिवारवाडा, हडपसर, सातारा रोड, नगररोड,  सिंहगड रोड, धायरी फाटा, पौड रोड, जंगली महाराज रोड, एफसी रोड, गणेश खिंड रोड भागांत व्यवसाय करता येणार आहे.

सर्व पेठा सील सादडी सदन,रविवार पेठ,रांका ज्वेलर्स रविवार‌पेठ, बुरडी पूल,बालाजी फरसाण पालखी विठोबा,पांगूळ आळी,कसबा पेठ,सोमवार पेठ,मंगळवार पेठ,ढोर गल्ली, जवळ जवळ सर्व गल्लीबोळातून ‌एकमेकाशी संपर्क  होऊ न देण्याचे काम युध्दपातळीवर सुरु आहे.

65 कंटेन्मेंट झोन कुठले?

मध्यवर्ती पुण्यातल्या सर्व पेठा (नारायण, सदाशिव आणि शनिवार पेठ वगळून), पर्वती दर्शन नीलायम, दांडेकर पूल,  तळजाई वस्ती, शिवदर्शन, दांडेकर पूल, शिवनेरी नगर, भाग्योदय नगर, काकडे वस्ती, मीठानगर, कोंढवा, कात्रज, सुखसागरनगर, बालाजीनगर, धनकवडी- गुलाबनगर, अप्पर इंदिरानगर, प्रेमनगर,  कामगार पुतळा, पाटील इस्टेट, शिवाजीनगर -म. गांधी झोपडपट्टी, येरवडा ताडीगुत्ता, जयप्रकाशनगर, गांधीनग ,नागपूर चाळ, फुलेनगर- येरवडा, धानोरी-कळस, वैदूवाडी, गोसावीवस्ती, सय्यदनगर, गुलामअलीनगर, सातववाडी, माळवाडी, हांडेवाडी, वेताळनगर, हडपसर- आदर्श कॉलनी, मीनाताई ठाकरे नगर, कोथरूड – शिवतारा सोसायटी, चंद्रगुप्त सोसायटी, ताडीवाला रस्ता, वडगाव शेरी, गणेशनगर, गुलटेकडी, डायस प्लॉट

\

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.