Pune Crime News : 12 वर्षापासून फरार असलेल्या आरोपीला अटक

एमपीसी न्यूज – फसवणूकीच्या गुन्ह्यात गेल्या 12 वर्षांपासून फरार असलेल्या (Pune Crime News) आरोपीच्या गुन्हे शाखेच्या पोलिसांनी मुसक्या आवळल्या आहेत. कोल्हापूरात कारवाईकरून त्याला पकडण्यात आले आहे. अनेक दिवसांपासून तो पोलिसांना गुंगारा देण्यात यशस्वी होत होता.

 

अशोक गुराप्पा वैदु (वय 53, रा. जयसिंगपुर, जि. कोल्हापूर) असे अटक करण्यात आलेल्याचे नाव आहे. त्याच्यावर लष्कर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद आहे.

 

Dhanori news : महिलांनी मारहाण केल्यामुळे रिक्षा चालकाने खाणीत उडी घेऊन संपवले जीवन

 

2011  मध्ये त्याच्यावर फसवणूकीचा गुन्हा नोंद झाला. त्यानंतर तो फरार झाला होता. तो कायम पोलिसांना गुंगारा देण्यात यशस्वी होत होता. गेल्या 12  वर्षांपासून फरार असणारा आरोपी हा राहत्या घरी आला असल्याचे पोलिसांना समजले. त्यानुसार, सहाय्यक आयुक्त सुनिल पवार यांच्या मार्गदर्शनाखाली पथकाने त्याला राहत्या घरातून सापळा रचून पकडले.

 

चौकशीत त्याने गुन्हा केल्याचे कबूल केले. त्याला पुढील (Pune Crime News) कारवाईसाठी लष्कर पोलिसांच्या ताब्यात दिले आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.