Pune Crime News : परदेशी महिलांना नोकरीवर ठेवून सुरू होता वेश्याव्यवसाय

एमपीसी न्यूज-मसाज सेंटरवर अवैधरित्या परदेशी महिलांना नोकरीस ठेवण्यात (Pune Crime News) आल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. या परदेशी  महिलांकडून वेश्या व्यवसायकरून घेतला जात होता. तत्पूर्वी व्हिसा कागदपत्रांची पूर्तता न केल्या प्रकरणी पुणे पोलिसांच्या परकीय नागरिक नोंदणी विभागाकडून (एफआरओ) छापा कारवाई करण्यात आली.

 

Pune Crime News : 12 वर्षापासून फरार असलेल्या आरोपीला अटक

 

कारवाईत मसाज सेंटरचा मालक, व्यवस्थापकासह जागा मालकाविरुद्ध गुन्हा नोंद केला. या महिला बिझनेस व्हिसावर भारतात आल्या होत्या. याप्रकरणी कोंढवा पोलीस ठाण्यात विदेशी व्यक्ती अधिनियम कायद्यानुसार गुन्हा नोंद केला आहे.

 

 

थायलंड देशातील या महिला असल्याचे सांगितले असून, 4 महिलांना मुंढवा येथील शासकीय महिला सुधारगृह येथे ठेवण्यात आले. चार महिलांना लवकरच मायदेशी पाठविण्यात येणार असल्याचे विशेष शाखेचे पोलीस उपायुक्त आर. राजा यांनी सांगितले. परकीय नागरिक नोंदणी विभागाच्या नियमावलीनुसार परदेशी व्यक्तीने नोकरी करण्यासाठी व्हिसा संदर्भातील आवश्यक त्या कागदपत्रांची पूर्तता करणे गरजेचे आहे. परंतु, कागदपत्रांची पूर्तता न केल्याने त्यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल (Pune Crime News) करण्यात आला आहे.

 

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.