Pune News : तिसऱ्या लाटेच्या पार्श्वभूमीवर पालिकेकडून लहान मुलांसाठी ”पेडियाट्रिक वॉर्ड”

एमपीसी न्यूज – तज्ज्ञांकडून कोरोनाची तिसरीला लहान मुलांसाठी घातक ठरु शकते असा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे. त्या पार्श्वभूमीवर पालिका प्रशासन तयारीला लागले असून पालिकेच्या राजीव गांधी रुग्णालया पाठोपाठ जम्बो कोविड सेंटरमध्ये येत्या आठवड्याभरात लहान मुलांसाठी ”पेडियाट्रिक वॉर्ड” सुरु केला आहे.

पालिकेकडून येरवड्यातील राजीव गांधी रुग्णालयात सुविधा निर्माण केली जात आहे. त्यातच आता जम्बो कोविड सेंटरमध्येही 20 बेडचा स्वतंत्र वॉर्ड तयार केला जाणार आहे. या ठिकाणी वय वर्षे 1 ते 14 पर्यंतच्या मुलांवर उपचार केले जाणार आहेत. तूर्तास वीस बेडचे नियोजन करण्यात आले असून हे बेड नंतर वाढविण्याची तयारी ठेवण्यात आली आहे.

लहान मुलांसाठीच्या व्हेंटिलेटर मशीनसाठी विशिष्ट प्रकारचे सॉफ्टवेअर लागते. हे सॉफ्टवेअर पालिकेकडून खरेदी केले जाणार असून, सद्यस्थितीत वापरात असलेल्या व्हेंटिलेटरला हे सॉफ्टवेअर अपलोड केले जाणार आहे. त्यामुळे हे व्हेंटिलेटर मुलांसाठी वापरता येणार आहेत. जम्बोमध्ये पेडियाट्रिक डॉक्टरांची बैठक घेण्यात आली. या बैठकीमध्ये लहान मुलांच्या कोविड सुविधेबाबत चर्चा करून तयारीबाबत नियोजन करण्यात आले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.