Pune News : पुण्यातील विविध प्रश्नावर अजित पवारांनी मंत्रालयात बैठक बोलावली, महापौरांना मात्र निमंत्रण नाही

एमपीसी न्यूज – राज्याचे उपमुख्यमंत्री आणि पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार यांनी आज पुणे महापालिकेतील विविध प्रश्नावर आज मंत्रालयात बैठक बोलावली आहे. या बैठकीला आठ मंत्री, वेगवेगळ्या पाच खात्यांचे सचिव, पुणे महापालिकेचे आयुक्त, पुणे महापालिकेतील विरोधी पक्ष नेत्या दिपाली धुमाळ यांच्यासह शहरातील राष्ट्रवादी काँग्रेसचे काही आमदारही उपस्थित राहणार असल्याची माहिती. परंतु या बैठकीला मात्र पुण्याचे महापौर मुरलीधर मोहोळ यांना मात्र निमंत्रण देण्यात आले नाही.

पुणे महानगर पालिकेत सध्या भारतीय जनता पक्षाची सत्ता आहे. मात्र सत्ता भाजपची असली तरी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अजित पवार प्रशासनामार्फत कारभार करत असल्याचे दिसत आहे.

अंबिल ओढा येथील अतिक्रमण कारवाई वरून राज्य सरकार आणि पुणे महापालिकेत तू तू मै मै सुरु असतानाच अशाप्रकारे पुण्याचे प्रथम नागरिक असणाऱ्या महापौरांना विश्‍वासात न घेता पुणे शहराच्या विविध प्रश्नावर चर्चा करणार तरी कशी असा प्रश्न यानिमित्ताने उपस्थित झाला आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.