Pune News : आंबिल ओढ्याला पूर येऊन दोन वर्षे उलटून देखील सीमा भिंतींचे काम अर्धवट

एमपीसी न्यूज : आंबिल ओढ्याला पूर येऊन दोन वर्षे उलटून गेली, तरीही सीमा भिंतींचे काम अर्धवट आहे. या ठिकाणी राहणाऱ्या नागरिकांच्या सुरक्षेचे प्रशासनाला देणेघेणे नाही. अशी टीका नगरसेवकांनी मुख्य सभेत केली.

प्रशासनातर्फे आंबिल ओढ्याच्या बाजूने सीमा भिंत बांधण्याचे काम सुरू आहे. पेशवे पार्क, पद्मजा पार्क, गजानन महाराज चौक, केके मार्केट, कात्रज स्मशानभूमी, वैंकुठ स्मशानभूमी यासह इतर भागात सीमा भिंती बांधली जाणार आहे. त्यासाठी लहान निधी देण्याचा प्रस्ताव मान्य करण्यात आला. पण नगरसेवकांनी हा निधी देताना या संपूर्ण कामावर ताशेरे ओढले. “दोन-दोन वर्ष नागरिकांनी त्रास सहन केला, पण काही केले नाही. निवडणूका डोळ्यासमोर ठेवून हा वर्गीकरणाचा प्रस्ताव मांडला आहे का असा संशय येत आहे, अशी टीका दत्ता धनकवडे यांनी केली.

नगरसेवक अश्विनी कदम म्हणाल्या, “निधीची उपलब्धता नव्हती म्हणून ठेकेदार हळू काम करतात. आयुक्तांनी वारंवार बैठका घेतल्या तेव्हाच निधाचा विचार का झाला नाही. यामध्ये गुरुराज सोसाट्याच्या भिंतींचे , स्टेट बँक कॉलनी येथील भिंती बांधण्याचा यात उल्लेख नाही. मग या सोसायटीती भिंत बांधनार नाही का? आरणेश्वर येथील पुलाचे अर्धवट आहे, आमचा त्रास कधी कमी होणार.

नगरसेवक महेश वाबळे म्हणाले, “अनेक ठिकाणी व्यवस्थित काम सुरू आहे. अतिरिक्त आयुक्तांनी याठिकाणी भेटी दिल्या आहेत.” “भविष्यात आणखी मोठा पाऊस येईल, त्यामुळे  आंबिल  ओढ्याची खोली वाढवली पाहिजे. नाला चॅनलिंग केले पाहिजेत, त्यामुळे पूराचा धोका कमी होईल, असे सुभाष जगताप यांनी सांगितले. राणी भोसले, प्रकाश ढोरे, आरती कोंढरे, आबा बागुल यांनीही चर्चेत सहभाग घेतला.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.