Pune News : अर्जुनराव सोनवणे यांचे वृद्धापकाळाने निधन 

एमपीसी न्यूज – निमगाव वाघा – बाराखोंगळ येथील अर्जुनराव जबाजी तथा भाऊसाहेब सोनवणे (वय 82) यांचे शनिवारी (दि.20) सकाळी वृद्धापकाळाने राहत्या घरी निधन झाले.

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या आंतरविद्याशाखेचे अधिष्ठाता व महाराष्ट्र राज्य मागासवर्गीय आयोगाचे सदस्य, प्रसिद्ध शिक्षणतज्ज्ञ डॉ. संजीव सोनवणे यांचे ते वडील होत. अर्जुनराव सोनवणे यांच्या पश्चात पत्नी, भाऊ, मुले, सुना व नातवंडे असा परिवार आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.