Pune News : राष्ट्रीय रोईंग स्पर्धेत  सेनादल क्रीडा मंडळाचे वर्चस्व

एमपीसी न्यूज- सेनादल क्रीडा ( Pune News ) मंडळाने 40 व्या राष्ट्रीय रोईंग स्पर्धेत विजेतेपद मिळविले आहे. नौदलाच्या सतनाम सिंगनेही लक्षणीय यश मिळविले आहे.

सीएमईच्या आंतरराष्ट्रीय ट्रॅकवर झालेल्या या स्पर्धेत सेनादलाने आठपैकी सात शर्यती जिंकल्या. यामध्ये पॅरा सिंगल स्कल्सचाही समावेश आहे. राष्ट्रीय स्पर्धेत युवा ऑलिम्पियन सतनाम सिंगने 2000 मीटर शर्यतीत मिळविलेले विजेतेपद विशेष ठरले, तर महाराष्ट्राला मृण्मयीच्या सुवर्णपदकाचा दिलासा मिळाला.

सेनादल आणि लष्कर या दोन क्रीडा संस्थांमध्ये झालेल्या अंतिम लढतीत सेनादलाने बाजी मारली. कॉक्स एट्स, क्वाड्रपल स्कल्स, कॉक्सलेस फोर, डबल स्कल्स, लाईटवेट ( Pune News ) डबल स्कल्स या प्रकारात लष्कराच्या या दोन संघांतच खरी चुरस झाली.

युवा ऑलिम्पियन सतनाम सिंगने 7 मिनिट11.9 सेकंद वेळ देताना 2000 मीटर शर्यतीत अव्वल स्थान पटकावले. पुरुष एकेरी स्कल्स प्रकारातील हा सर्वांत सनसनाटी निकाल ठरला. सतनामने दीड महिन्यापूर्वी पहिले राष्ट्रीय विजेतेपद मिळविले होते. त्याला ऑलिम्पियन अरविंद सिंग, करमजीत यांचे आव्हान होते. सतनामच्या यशामुळे स्पर्धेत या एकाच शर्यतीत सेनादलाला दुसऱ्या क्रमांकावर समाधान मानावे लागले.

Nigdi News: ‘एसआरए’चा दुर्गानगर, शरदनगर येथील झोपडपट्टीचा सर्व्हे बनावट – मनोज गायकवाड

महिला विभागात महाराष्ट्राला मृण्मयी साळगांवकरने मिळविलेल्या सुवर्णपदकाचा दिलासा मिळाला. महाराष्ट्रासाठी स्पर्धेतील हे एकमेव यश होते. मृण्मयीने 8 मिनिट 24.4 सेकंद अशी वेळ दिली. मूळ नाशिकच्या असलेल्या मृण्मयीने गतविजेत्या कुशप्रीत कौरला पाच सेकंदानी मागे टाकले. उत्तर प्रदेशाची किरण देवी तिसरा क्रमांक मिळविला.

महिला विभागात ओडिशाने वर्चस्व राखले. त्यांनी तीन, मणिपूरने दोन, तर महाराष्ट्र, केरळने प्रत्येकी एक शर्यत जिंकली. ओडिशाच्या मुलींनी कॉक्स एट्स, कॉक्सलेस पेअर्स, लाईट वेट डबल स्कल्स या शर्यती जिंकल्या. मणिपूरने क्वाड्रपल स्कल्स, डबल स्कल्स, तर केरळने कॉक्सलेस फोर शर्यत जिंकली.

स्पर्धेत आता उद्या शनिवारपासून खुल्या स्प्रिंट स्पर्धा प्रकाराला ( Pune News ) सुरुवात होईल.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.