Pune News : पेट्रोल, डिझेल व स्वयंपाकाचा गॅस जीएसटीच्या कक्षेत आणा; भारतीय मजदूर संघाची मागणी

एमपीसी न्यूज – गेल्या वर्षभरात जीवनावश्यक वस्तूंच्या खाद्यपदार्थांच्या किंमतीमध्ये मोठ्या प्रमाणात वाढत आहे. त्याचप्रमाणे पेट्रोल डिझेल, स्वयंपाकाचा गॅसच्या किमती आभाळाला भिडलेल्या आहेत.त्यामुळे कामगारांचे,फेरीवाले,रिक्षा चालक, फेरीवाले, बांधकाम कामगार यांचे जीवनमान महागाईमुऴे खालावले आहे.त्यामुळे पेट्रोल डिझेल व स्वयंपाकाचा गॅस जीएसटीच्या कक्षेत आणून अन्य कर कमी करावेत. अन्यथा भारतीय मजदूर संघ रस्त्यावर उतरुन तीव्र आंदोलन करेल, असा इशारा भारतीय मजदूर संघाचे अध्यक्ष अर्जुन चव्हाण व सेक्रेटरी बाळासाहेब भुजबळ यांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर झालेल्या निर्दशनाच्या वेऴी दिला.

 

या आंदोलनाच्या वेळी संघटनेच्यावतीने दहा विविध मागण्या करण्यात आल्या.त्याचे निवेदन जिल्हाधिकारी यांना देण्यात आले.

मजदूर संघाने केलेल्या मागण्या अशा

जीवनावश्यक वस्तूंच्या व खाद्यपदार्थांवरील जीएसटी रद्द करावा, पेट्रोल डिझेल, स्वयंपाकाचा गॅस जीएसटीच्या कक्षेत आणून महागाईवर नियंत्रण ठेवावे,गेल्या पाच ते सात वर्षात उद्योगातील किमान वेतनात वाढ झाली नाही, त्यामुळे प्रलंबित किमान वेतन दर व महागाई भत्ता पुर्वलक्षी फरकाने कामगारांना द्यावा,रोजगार निर्मिती होईल अशा योजनांची अंमलबजावणी करावी,कामगारांच्या पगारातून वजावट होणारा व्यवसाय कर रद्द करावा,रोहयोची कामे काढून मागेल त्याला काम द्यावे,कारागीर,बलुतेदारांना त्यांच्या कामाचा योग्य मोबदला द्यावा,रिक्षा चालक,मालक यांना करातून सुट द्यावी, स्वामीनाथन आयोगाच्या शिफारशीनुसार शेत मालाच्या किंमती निर्धारीत करा व सुधारणा लागू करा,व्दितीय श्रम आयोगाच्या शिफारशीनुसार सामाजिक सुरक्षेचा अधिकार मुलभूत हक्कांमध्ये समाविष्ट करा.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.