PIFF : ‘कान्स’ चित्रपट महोत्सवात दिसणार पुणे इंटरनॅशनल फिल्म फेस्टिव्हल!

हा सन्मान मिळवणारा PIFF हा भारतातील एकमेव चित्रपट महोत्सव आहे.

एमपीसी न्यूज : पुणे इंटरनॅशनल फिल्म फेस्टिव्हल (PIFF), महाराष्ट्र सरकार आणि पुणे फिल्म फाऊंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने गेल्या 20 वर्षांपासून आयोजित महाराष्ट्र सरकारचा अधिकृत चित्रपट महोत्सव, ‘फेस्टिव्हल हब’ विभागात सहभागी होण्यासाठी आमंत्रित करण्यात आले आहे. आगामी कान्स चित्रपट महोत्सव 17 मे ते 28 मे दरम्यान फ्रान्समध्ये होणार आहे.

हा सन्मान मिळवणारा PIFF हा भारतातील एकमेव चित्रपट महोत्सव आहे. या विभागात सहभागी होण्‍यासाठी आमंत्रित करण्‍यात आलेल्‍या इतर चित्रपट महत्‍त्‍वांमध्‍ये दक्षिण कोरियाचा बुचेऑन इंटरनॅशनल फॅन्‍टास्टिक चित्रपट महोत्सव, झेक प्रजासत्ताकमधील कार्लोवी वेरी आंतरराष्‍ट्रीय चित्रपट महोत्सव आणि बीएफआय लंडन चित्रपट महोत्सव यांचा समावेश होतो.

फेस्टिव्हल डायरेक्टर जब्बार पटेल, ‘न्यू एरा ऑफ फेस्टिव्हल्स: एक्सपांडिंग बियॉन्ड हायब्रिड्स’ या थीमवर चर्चेदरम्यान प्रतिष्ठित मंचावर PIFF चे प्रतिनिधित्व करतील.

IIM Campus : महाराष्ट्राची भूमी ही नेहमीच महत्त्वाची राहिली आहे – राष्ट्रपती रामनाथ कोविंद

हे सत्र 19 मे रोजी स्थानिक वेळेनुसार सकाळी 11 वाजता मरीना स्टेज (रिव्हिएरा) येथे होईल. इतर लोकांना सहभागी होण्यासाठी ते ऑनलाइन प्लॅटफॉर्मद्वारे देखील उपलब्ध असेल.

“महोत्सवाचे आयोजन करताना सर्वोत्कृष्ट आंतरराष्ट्रीय आणि प्रादेशिक सिनेमांना प्रोत्साहन देण्यासाठी आणि महामारीच्या आव्हानात्मक परिस्थितीशी यशस्वीपणे जुळवून घेण्याच्या आमच्या प्रयत्नांना हे आमंत्रण देण्यात आले आहे. PIFF हा भारतातील एकमेव चित्रपट महोत्सव आहे जो विस्तारित स्वरुपात इतर शहरांमध्ये पसरलेला चित्रपटांमधील नवीन कलागुणांना लाभ देणारा आहे,” पटेल म्हणाले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.