Dehu Road News : पाणीपुरवठा सुरळीत करण्याबाबत राजेंद्र तरस यांची महापालिका प्रशासनाकडे मागणी

एमपीसी न्यूज – विकासनगर, किवळे, मामुर्डी आणि साईनगर या भागामध्ये गेल्या पंधरा दिवसापासून कमी दाबाने व अवेळी पाणीपुरवठा होत असल्याने नागरिक अतिशय हैराण झाले आहेत. या भागातील पाणीटंचाई दूर करून पाणीपुवरठा सुरळीत करण्याची मागणी युवा सेनेचे उपशहर अधिकारी राजेंद्र तरस यांनी महापालिका प्रशासनाकडे केली आहे.

या संदर्भात तरस यांनी ब क्षेत्रीय अधिकाऱ्यांची भेट घेऊन त्यांना निवेदन दिले. पाणी ही नागरिकांची मूलभूत गरज आहे. नागरिकांना पाण्याशिवाय काही करता येत नाही. करदात्या नागरिकांना मुबलक पाणीपुरवठा करणे हे आपले महापालिकेचे कर्तव्य असून यामध्ये महापालिका असमर्थ ठरताना दिसत असल्याचे सांगून तरस यांनी या विषयाकडे  अधिक लक्ष वेधले आहे.

दोन दिवसांपूर्वी किवळे गावची यात्रा होती. या वेळी विकासनगर व किवळे गाव परिसरात पाण्याची टंचाई निर्माण झाली. यात्रा असल्याने सर्व गावांमध्ये नातेवाईक उत्सवासाठी आले होते, अशावेळी पाणी देण्यास टाळाटाळ करण्यात आली तसेच न पटणारी कारणे देण्यात आली. या भागात पाणीपुरवठा सुरळीत करावा; अन्यथा जनआंदोलन उभारण्यात येईल, असा इशारा तरस यांनी निवेदनात दिला आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.