Pune News : फेरफार अदालतीचे 11 मे रोजी आयोजन

एमपीसी न्यूज – आरोग्य विभागाने दिलेल्या निर्देशानुसार कोविड 19 बाबतच्या नियमांचे पालन करुन पुणे जिल्ह्यातील सर्व तालुक्यात क्षेत्रीयस्तरावर 11 मे रोजी फेरफार अदालत आयोजित केली जाणार आहे.

 

फेरफार नोंदी प्रलंबित आहेत अशा व्यक्तींनी 11 मे रोजी फेरफार अदालतींमध्ये संबंधित मंडळाच्या मुख्यालयात उपस्थित राहवे.त्यावेळी मंडळ अधिकारी यांना आवश्यक ते कागदपत्र उपलब्ध करून देऊन आपल्या नोंदी निर्गत करून द्याव्यात असे आवाहन जिल्हाधिकारी राजेश देखमुख यांनी केले आहे.

 

लोकाभिमुख प्रशासनाच्या संकल्पनेतून फेरफार अदालती मंडळ स्तरावर दर महिन्याच्या दुसरा बुधवारी आयोजित करण्यात येऊन जनतेच्या प्रलंबित साध्या, वारस, तक्रारी फेरफार नोंदी निर्गत करण्याच्या सूचना आहेत.पुणे जिल्ह्यात 9 मे अखेर मुदत पुर्ण झालेल्या 14 हजार 134 नोंदी प्रलंबित असून या नोंदीमध्ये प्रामुख्याने साध्या, वारस, तक्रार व मुदत पूर्ण झालेल्या सर्व प्रकारच्या नोंदी निर्गत करण्याबाबत संबंधितांना सूचना देण्यात आलेल्या आहेत.

या अदालतीच्या दिवशी जास्तीत जास्त नोंदी निर्गत करण्याच्या दृष्टीने प्रयत्न केले जाणार आहेत. फेरफार अदालतीसाठी प्रत्येक मंडळ स्तरावर संपर्क अधिकारी नियुक्त केले आहेत.त्याशिवाय उपविभागीय अधिकारी, तहसीलदार यांना देखील उपस्थित राहण्याच्या सूचना दिल्या आहेत, अशी माहिती उपजिल्हाधिकारी संजय तेली यांनी दिली आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.