Pune News : काँग्रेस नेते राजीव सातव यांना कोरोनाची लागण, व्हेंटिलेटरवर प्रकृती मात्र स्थिर

एमपीसी न्यूज – गुजरात काँग्रेसचे प्रभारी आणि माजी खासदार राजीव सातव यांना कोरोनाची बाधा झाली असून त्यांच्यावर पुण्यातील जहांगीर हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहे. रुग्णालयातील डॉक्टर आणि राज्यमंत्री विश्वजीत कदम यांनी आज पत्रकार परिषद घेत त्यांच्या प्रकृतीविषयी माहिती दिली.

विश्वजीत कदम म्हणाले, 19 एप्रिलला राजीव सातव यांना कोरोनाची लक्षणे दिसून आली. त्यानंतर 22 तारखेला त्यांचा स्वॅब टेस्ट पॉझिटीव्ह आला. 23 तारखेला ते पुण्यातील जहांगीर हॉस्पिटलमध्ये भरती झाले. मात्र प्रकृती खालावल्यामुळे 25 तारखेला त्यांना आयसीयुमधे आणि त्यानंतर 28 तारखेला व्हेंटीलेटरवर ठेवण्यात आले.

कदम म्हणाले, सातव यांची इच्छाशक्ती जबरदस्त आहे. जहांगीर हॉस्पिटलचे डॉक्टर त्यांच्यासाठी सर्व प्रयत्न करतायत. आवश्यकतेनुसार सर्व उपचार त्यांच्यावर करण्यात आले. सध्या त्यांची प्रकृती स्थिर असून ते उपचाराला प्रतिसाद देत आहेत. कुटुंबातील सर्वजण या ठिकाणी आलेले आहेत. सर्वांचे प्रयत्न सुरू आहेत. आवश्यकता असल्यास त्यांना मुंबईला हालवण्यात येईल.

राजीव सातव हे राहुल गांधी यांच्या यंग ब्रिगेड मधील विश्वासू सहकारी आहेत त्यासोबत ते हिंगोलीचे माजी खासदार ही आहेत. 2014 ला जेव्हा देशभरात मोदी लाट होती तेव्हा हिंगोली लोकसभा मतदारसंघातून ते निवडून आले होते. काँग्रेस आणि गांधी घराण्याशी निष्ठा असल्याने त्यांच्याकडे गुजरात काँग्रेसचे प्रभारी पद देण्यात आले होते. राजीव सातव यांची प्रकृती खालावल्याचे कळाल्यानंतर स्वतः राहुल गांधी यांनी फोन करून डॉक्टरांकडे विचारपूस केली आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.