Pune News : पंतप्रधान नरेंद्र मोदीवर टीका करणं म्हणजे सूर्यावर थुंकण्यासारखं- चंद्रकांत पाटील 

संजय राऊत यांच्यावर टीका

एमपीसी न्यूज –  पंतप्रधान नरेंद्र मोदी सूर्य,चंद्र, धूमकेतू आहे (Pune News) पण ते भाजपच्या वॉशिंग मशीन बाबत बोलत नाही अशी टीका पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर संजय राऊत यांनी केली आहे.
त्या बाबत भाजपचे नेते पालकमंत्री चंद्रकांत पाटील म्हणाले की,संजय राऊत यांना जेलमध्ये जावे लागलं आहे.त्यामुळे त्यांची पातळी घसरली आहे.ही बाब सर्व सामान्य माणसाला आवडत नाही.जगातील सर्वोच्च आणि शक्तीशाली नेते म्हणून जगाने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना गौरवले आहे.

 

Alandi News : आळंदीत भगवान महावीर जन्म कल्याणक उत्साहात संपन्न

2014 साली नरेंद्र मोदी हे देशाचे पंतप्रधान झाल्यापासून देश वेगाने पुढे जात आहे.त्यामुळे परकीय चलनात वाढ झाली असून अनेक देशांनी रुपयांमध्ये व्यवहार करण्यास मान्यता दिली आहे.

तसेच इंग्लंडला मागे टाकून आपली अर्थव्यवस्था पाचव्या क्रमांकावर नेण्याचे काम पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले आहे.त्यामुळे अशा माणसावर (पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर) टीका करणे म्हणजे सूर्यावर थुंकण्यासारखे असल्याचे (Pune News) सांगत संजय राऊत यांच्या विधानावर त्यांनी टीका केली.

 

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.