Pune news: वाढदिवसानिमित्त कोणताही समारंभ करू नका; दूरध्वनीवरून शुभेच्छा द्या – डॉ. नीलम गोऱ्हे यांचे आवाहन

सुरक्षित अंतराचे पालन करून सहकार्य करण्याची विनंती डॉ. गो-हे यांनी केली आहे.  

एमपीसी न्यूज – कोरोनाच्या पार्श्वभूमीवर वाढदिवस अंत्यत साधेपणाने साजरा करणार आहे. त्यानिमित्ताने कोणताही समारंभ करू नये. व्हिडिओ, दूरध्वनीवरून शुभेच्छा द्याव्यात, असे आवाहन विधानपरिषदेच्या उपसभापती डॉ. डॉ. नीलम गोऱ्हे यांनी कार्यकर्त्यांना केले आहे. याबाबतचा व्हिडीओ त्यांनी सोशल मीडियावर पोस्ट केला आहे.

डॉ. नीलम गो-हे आवाहन करताना म्हणतात, पावसाळी अधिवेशनामध्ये महाराष्ट्र विधान परिषदेच्या उपसभापती म्हणून परत एकदा माझी फेरनिवड करण्यात आली. यासाठी शिवसेनेचे पक्षप्रमुख, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री  उद्धव ठाकरे व उपमुख्यमंत्री अजित पवार, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस,शिवसेनेचे नेते मंडळी यांनी माझ्या नावाची सहमती दिली आणि सभागृहांमध्ये ही बिनविरोध  निवड करण्यात आली त्याबद्दल मी महाराष्ट्रातील जनतेचे आभार मानते. हिंदुह्रदयसम्राट शिवसेनाप्रमुख स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांनी सातत्याने 80 टक्के समाजकारण आणि 20 टक्के राजकारणाच धडा दिला होता.  त्यावर वाटचाल करण्याचा माझा हेतू राहील .

या सर्व निवडणुकीवर राष्ट्रवादीचे काँग्रेसचे नेते शरद पवार हे काटेकोर लक्ष देऊन होते. त्यांचे मी आभार मानते.
आपले व या सर्व कामांमध्ये आई जगदंबा तुळजाभवानी यांचे आशीर्वाद मला मिळावेत  अशी मी महाराष्ट्राच्या जनतेच्या चरणी मी प्रार्थना करते. माझा  वाढदिवस कोणताही  सभारंभ न करता सर्वांच्या शुभेच्छा माझ्यापर्यंत पोहोचतील अशी व्यवस्था आपण करुयात. त्या दूरध्वनीवरून अथवा व्हिडिओद्वारे आपण संवाद साधून शुभेच्छा देऊ शकता. सुरक्षित अंतराचे पालन करून सहकार्य करण्याची विनंती डॉ. गो-हे यांनी केली आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.