Pune News: बाळासाहेब ठाकरे नाट्यगृहात विद्युतविषयक कामे

एमपीसी न्यूज: कोथरुड येथील शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे नाट्यगृहात विविध विद्युतविषयक कामे करण्यासाठी स्थायी समितीने मान्यता दिल्याची माहिती अध्यक्ष हेमंत रासने यांनी आज पत्रकार परिषदेत दिली.

रासने म्हणाले, ‘कोथरुड येथे शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या नावाने नव्याने नाट्यगृहाची इमारत बांधण्यात आली आहे. या इमारतील विद्युत विषयक कामे करण्यासाठी सुमारे ७५ लाख ८५ हजार रुपयांच्या निविदेला मंजुरी देण्यात आली. इन डोअर फीटिंग, पंखे, वॉटर कुलर, पॉइंट वायरिंग, केबल टाकून विद्युत व्यवस्था, पी. ए. सिस्टिम बसविणे अशाप्रकारची कामे करण्यात येणार आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.