Pune News: एल्गार परिषद; एनआयएने पुण्यातून तिघांना केली अटक

या प्रकरणी यापूर्वी सुधा भारद्वाज, अरुण फरेरा, गौतम नवलाखा, कवी वर हिरा राव, वर्णन गोन्साल्विस, रोना विल्सन, सुरेंद्र गडलिंग, सोमा सेन, सुधीर ढवळे, महेश राऊत, आनंद तेलतुंबडे, हनी बाबू यांना अटक करण्यात आली आहे.

एमपीसी न्यूज- एल्गार परिषद प्रकरणात सहभागी असल्याच्या कारणावरून एनआयएने कबीर कला मंच या संघटनेशी संबंधित तिघांना अटक केली आहे. सागर गोरखे, रमेश गायचोर यांना सोमवारी तर ज्योती जगताप हिला मंगळवारी अटक केली आहे.

कोरेगाव भीमा येथील लढाईस 200 वर्ष पूर्ण झाल्याच्या निमित्ताने पुण्यातील शनिवारवाडा येथे 31 डिसेंबर 2017 रोजी एल्गार परिषद झाली होती. या परिषदेच्या आयोजनात नक्षलवाद्यांशी संबंध असल्याच्या कारणावरून आतापर्यंत देशभरातून तब्बल 12 जणांना अटक करण्यात आली आहे.

रमेश गायचोर आणि सागर गोरखे यांच्या विरोधात विश्रामबाग पोलीस ठाण्यात फिर्यादी तुषार दामगुडे यांनी यापूर्वी तक्रार दिली होती.

_MPC_DIR_MPU_II

या प्रकरणी यापूर्वी सुधा भारद्वाज, अरुण फरेरा, गौतम नवलाखा, कवी वर हिरा राव, वर्णन गोन्साल्विस, रोना विल्सन, सुरेंद्र गडलिंग, सोमा सेन, सुधीर ढवळे, महेश राऊत, आनंद तेलतुंबडे, हनी बाबू यांना अटक करण्यात आली आहे.

गोरखे आणि गायचोर यांच्यावर 2011 मध्ये ठाणे पोलिसांनी नक्षलवादी संघटनाशी संबंध असल्याचा गुन्हा दाखल केला होता. त्यानंतर काही महिने दोघे पसार होते. 2013 मध्ये त्यांना याप्रकरणी अटक देखील करण्यात आली होती.

एटीएसच्या तपासात त्यांनी गडचिरोली येथील जंगलात शस्त्र प्रशिक्षण घेतल्याचे सांगितले होते. नक्षलवादी संतोष शेलार आणि प्रशांत कांबळे यांच्या संपर्कात ते असल्याचे तपास पथकातील अधिकाऱ्यां मार्फत दावा करण्यात आला आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

You might also like