Pune Vegetable Price : सलग दुसऱ्या आठवड्यात फळभाज्यांची आवक कमी

एमपीसी न्यूज – पुणे जिल्ह्यासह विभागात पावसामुळे मार्केट यार्डात सलग दुसऱ्या आठवड्यात फळभाज्यांची आवक कमी झाली आहे. त्या तुलनेत मागणी जास्त असल्याने भेंडी, गवार, गाजर, हिरवी मिरची, काकडी, दोडकाच्या भावात 10 ते 20 टक्‍क्‍यांनी वाढ झाली होती. मागणी आणि पुरवठा यातील समतोलामुळे उर्वरित सर्व भाज्यांचे भाव गेल्या आठवड्याच्या तुलनेत स्थिर असल्याची माहिती व्यापारी विलास भुजबळ यांनी दिली.

 

रविवारी बाजारात 80 गाड्यांची आवक झाली. परराज्यातून आलेल्या मालामध्ये इंदौर येथून 7 टेम्पो गाजर, कर्नाटक, गुजरात येथून 3 टेम्पो कोबी, आंध्रप्रदेश, तामिळनाडू आणि गुजरात येथून 10 टेम्पो हिरवी मिरची, तामिळनाडू येथून शेवगा 3 टेम्पो, तर आग्रा आणि इंदौर येथून 40 ट्रक बटाटा, तर गुजरात आणि मध्य प्रदेश येथून लसूण 12 ट्रक आवक झाली होती.

स्थानिक आवकेमध्ये सातारी आलं सुमारे 600 गोणी, कोबी सुमारे 4 टेम्पो, फ्लॉवर 10 टेम्पो, भेंडी आणि गवार प्रत्येकी सुमारे 5 टेम्पो, सिमला मिरची 10 टेम्पो, हिरवी मिरची 3 टेम्पो, टोमॅटो 6 हजार पेटी आवक झाली होती. तर, भुईमुग शेंगा सुमारे 100 गोणी, पारनेर, पुरंदर येथून मटार अवघी सुमारे 30 गोणी, तांबडा भोपळा 8 टेम्पो, कांदा सुमारे 70 ट्रक आवक झाली होती.

फळभाज्यांचे दहा किलोचे भाव :
कांदा : 250-380, बटाटा : 250-320, लसूण : 600-1200, आले : 200-300, भेंडी : 300-400, गवार : 500-600, टोमॅटो : 150-250, दोडका : 300-500, हिरवी मिरची : 300-450, दुधी भोपळा : 250-350, चवळी : 250-300, काकडी : 200-250, कारली : हिरवी 300-400, पांढरी 250-300, पापडी : 350-400, पडवळ : 200-250, फ्लॉवर : 150-250, कोबी : 120-160, वांगी : 300-400, डिंगरी : 200-250, नवलकोल : 100-120, ढोबळी मिरची : 250-320, तोंडली : कळी 450-500, जाड : 180-200, शेवगा : 500-700, गाजर : 200-250, वालवर : 300-400, बीट : 140-150, घेवडा : 600-700, कोहळा : 100-150, आर्वी : 200-250, घोसावळे : 200-250, ढेमसे : 250-300, पावटा : 300-400, भुईमूग शेंग : 300-400, मटार : 1400-1600, तांबडा भोपळा : 60-100, सुरण : 200-220, मका कणीस : 60-120, नारळ (शेकडा) : 1000-1600.

कोथिंबीरच्या भावात वाढ

मागणी वाढल्यामुळे कोथिंबीरीच्या भावात वाढ झाली आहे.  कोथिंबीरीच्या भावात घाऊक बाजारात गेल्या आठवड्याच्या तुलनेत जुडीमागे तब्बल 20 रुपयांनी वाढ झाली आहे. तर, पालक, चाकवत आणि मुळ्याच्या भावात अनुक्रमे जुडीमागे 5, 4 आणि 3 रुपयांनी वाढ झाली आहे. राजगिरा, शेपू आणि अंबाडीच्या भावात जुडीमागे प्रत्येकी 2 रुपयांनी वाढ झाली आहे.

तर, दुसरीकडे आवक वाढल्यामुळे कांदापात, चुका, जवळईच्या भावात जुडीमागे अनुक्रमे 8, 6 आणि 5 रुपये घट झाली आहे. याबरोबरच चाकवतच्या भावात 4 रुपये, मेथीच्या भावात दोन रुपयांनी घसरण झाली आहे.

कोथिंबीरीची आवक गेल्या आठवड्याच्या तुलनेत स्थिर असून, रविवारी दीड लाख जुडी आवक झाली. त्यापैकी साठ टक्केहून अधिक आवक कर्नाटक येथून झाली आहे. मेथीची आवक मात्र वाढली आहे. गेल्या आठवड्यात 20 हजार जुडी झाली होती. ती वाढून रविवारी 50 हजार जुडी झाल्याचे यावेळी सांगण्यात आले. पावसामुळे भिजलेल्या आणि खराब मालाचे प्रमाण अधिक आहे.

पालेभाज्यांचे भाव (शेकडा जुडी) :
कोथिंबीर : 1500-3500, मेथी : 1000-1600, शेपू : 800-1200, कांदापात : 800-1200, चाकवत : 800-1000, करडई : 800-1000, पुदिना : 400-600, अंबाडी : 800-1000, मुळे : 1400-1500, राजगिरा : 500-800, चुका : 500-600, चवळई : 700-800, पालक : 1000-1500.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.