Pune Fruit Price : पावसाचा डाळिंबाला फटका; फुलांनाही मागणी कमी

एमपीसी न्यूज – राज्यात सर्वत्र  झालेल्या पावसाचा फटका डाळींबालाही बसला आहे. औषध फवारणी अभावी तेल्या रोगाचा प्रादुर्भाव वाढल्यामुळे डाळींबाची आवक निम्म्याने घटली आहे. त्या तुलनेत मागणी जास्त असल्याने भावात 15 ते 20 टक्‍क्‍यांनी वाढ झाली आहे.

मागणी घटल्याने लिंबाच्या भागात गोणीमागे 50 रुपयांनी घट झाली आहे. मागणी व पुरवठा यातील समतोलामुळे उर्वरित सर्व फळांचे भाव गेल्या आठवड्याच्या तुलनेत स्थिर आहेत.

रविवारी बाजारात केरळ येथून अननस 3 ट्रक, मोसंबी 65 ते 70 टन, संत्री 15 ते 20 टन, डाळिंब 40 ते 50 टन, पपई 25 ते 30 टेम्पो, लिंबे अडीच ते तीन हजार गोणी, चिक्कू 1 हजार बॉक्‍स क्रेटस्‌, कलिंगड 10 ते 15 टेम्पो, सिताफळ 10 ते 15 टन, बोरे 50 ते 60 गोणी व खरबुजाची 4 ते 5 टेम्पो आवक झाली.

फळांचे भाव :
लिंबं (प्रति गोणी) : 150-300, अननस (डझन) : 70-270, मोसंबी : (3 डझन) : 120-280, (4 डझन ) : 40-110, संत्रा : (10 किलो) : 100-650, डाळींब (प्रति किलोस) : भगवा : 30-150, गणेश : 5-30, आरक्ता 10-50. कलिंगड : 5-20, खरबुज : 10-30, पपई : 5-20, चिक्कू : 100-700, सिताफळ 10-120, बोरे (10 किलो) : चमेली 120-150, उमराण 50-70, चेकनट 600-700.

फुलांना मागणी कमी

 मार्केट यार्डात फुलांची साधारण आवक होत आहे. अधिक मास सुरू असल्याने फुलांना मागणी कमी आहे. याकाळात सण-उत्सव नसतात. तसेच, लग्नकार्य कमी प्रमाणात असल्याने पुढील काही दिवस हिच परिस्थिती कायम राहिल.

शहरासह राज्यातील मंदिरे उघडल्यास फुलांच्या मागणीत वाढ होईल, असे व्यापारी सागर भोसले यांनी सांगितले. फुलउत्पादक क्षेत्रात पावसाने विश्रांती घेतल्याने मार्केटयार्डातील घाऊक फुलबाजारात चांगला माल दाखल होण्याच्या प्रमाणात वाढ झाली आहे.

फुलांचे प्रतिकिलोचे भाव :
झेंडू : 10-20, गुलछडी : 10-30, बिजली : 20-40, अष्टर : जुडी 8-15, सुट्टा 30-60, कापरी : 10-30, शेवंती : 20-60, (गड्डीचे भाव) गुलाबगड्डी : 5-10, गुलछडी काडी : 5-10, डच गुलाब (20 नग) : 20-50, लिलि बंडल : 3-6, जर्बेरा : 10-20, कार्नेशियन : 20-40.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.