Pune News : भिगवणमध्ये जुगार अड्ड्यावर छापा ; राजकीय नेते, शासकीय कर्मचारी यांच्यासह 26 जण ताब्यात

एमपीसी न्यूज – पुणे जिल्ह्यातील भिगवण येथे सुरु असलेल्या जुगार अड्ड्यावर भिगवण पोलिसांनी छापा टाकला. या कारवाईत राजकीय पदाधिकारी, शासकीय कर्मचारी, व्हाईट कॉलर नागरिक यांच्यासह 26 जणांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, भिगवण येथील निंबोडी रस्त्यावर असणाऱ्या डोंगराजवळ जुगार अड्डा चालवला जात असल्याची गोपनीय माहिती पोलिसांनी मिळाली. त्यानुसार पोलिसांनी या ठिकाणी छापा टाकत कारवाई केली. याठिकाणी आठ टेबलावर खेळवल्या जाणाऱ्या अड्ड्यांवर एक लाख 12 हजार 780 रोख रकमेसह एकूण 3 लाख 12 हजार 780 रुपयांचा ऐवज जप्त करण्यात आला.

बारामती, इंदापूर, दौंड, कर्जत, फलटण, माळशिरस अशा सहा तालुक्यातील 26 जुगारी याठिकाणी खेळत असल्याची माहिती मिळाली आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.