Pune News : कोथरूडमध्ये धान्य व फळ महोत्सवाचे आयोजन

एमपीसी न्यूज-महाराष्ट्र राज्य कृषी पणन मंडळाच्या पुणे विभागातर्फे (Pune News) कोथरूडमध्ये प्रथमच धान्य, फळ महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. हा महोत्सव 5 ते 9 एप्रिलदरम्यान कोथरूड बस स्टॅंडसमोरील मैदानात होणार आहे.

 

‘उत्पादक ते थेट ग्राहक विक्री’ या पणन मंडळाच्या योजनेनुसार डाळिंब, द्राक्ष, आंबा, अंजीर व भरडधान्य उत्पादक शेतकऱ्यांची उत्पादने या महोत्सवाच्या माध्यमातून ग्राहकांना थेट खरेदी करण्याची संधी मिळणार आहे.

 

Alandi News : कामदा एकादशी निमित्त माऊलीं मंदिरा मध्ये गर्दी

 

ग्राहकांनी येथे भेट देऊन जास्तीत जास्त शेतकऱ्यांना प्रोत्साहन द्यावे, असे आवाहन पणन मंडळाचे कार्यकारी संचालक दीपक शिंदे आणि पुणे विभागाचे उपसरव्यवस्थापक राजेंद्र महाजन (Pune News) यांनी केले आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.