Alandi News : कामदा एकादशी निमित्त माऊलीं मंदिरा मध्ये गर्दी

एमपीसी न्यूज-काल ( दि.1 एप्रिल) आळंदी येथे कामदा एकादशी निमित्त(Alandi News) श्री संत ज्ञानेश्वर महाराज संजीवन समाधी दर्शनासाठी भाविकांनी माऊलीं मंदिरात मोठी गर्दी केली होती.भाविकांचे उन्हापासून संरक्षण व्हावे यासाठी मंदिरा भवती हिरव्या जाळीचे आच्छादन बांधण्यात आले आहे. एकादशी निमित्त भाविकांसाठी  महाप्रसादाचे देवस्थान तर्फे आयोजन करण्यात आले होते.काल (दि.1) स्मार्त एकादशी होती. तर आज (दि. 2) भागवत एकादशी आहे.

 

Shirgaon Murder News : शिरगावच्या साई मंदिरासमोर राष्ट्रवादीच्या सरपंचाचा निर्घृण खून

 

  तसेच माऊली मंदिरात दि.31 मार्च पासून अखिल भारतीय सैनिक सामुदायिक ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण सोहळ्याला सुरवात झाली असून त्याची सांगता 5 एप्रिल ला काल्याचे किर्तनाने  होणार आहे.या सोहळ्यात ज्ञानेश्वरी वाचन,हरिपाठ, हरी कीर्तन ,प्रवचन अश्या दैनंदिन कार्यक्रमाचे आयोजन केले गेले आहे.या कार्यक्रमाचे आयोजन महाराष्ट्रातील माजी (Alandi News) सैनिकांनी केले आहे.याबाबतची माहिती देवस्थान व्यवस्थापक ज्ञानेश्वर वीर यांनी दिली.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.