Ajit Pawar : ‘मी ड्रायव्हर, पवार साहेब कंडक्टर आणि सुप्रिया तिकीट काढणार!’

एमपीसी न्यूज – राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) हे स्पष्ट वक्ते म्हणून ओळखले जातात. कुणाचाही मुलाहिजा न ठेवता ते रोखठोक बोलत असतात. ते कधी भरसभेत कार्यकर्त्यांनाच सुनावतात तर भरसभेतच विरोधकांना आव्हान देखील देतात, त्याचा प्रत्यय अनेकांना अनेक मिळालाय.

त्यानंतर आज देखील अजित पवारांचं हे रूप कार्यकर्त्यांना बारामतीत पाहायला मिळालं. मी ड्रायव्हर होतो, शरद पवार साहेबांना कंडक्टर करतो आणि सुप्रियाला तिकीट काढायला सांगतो, असं म्हणत त्यांनी एका कार्यकर्त्याचे कान टोचले.

या प्रकरणी अधिक माहिती, बारामती तालुक्यातील भिलारवाडी गावात अजित पवारांचा एक जाहीर कार्यक्रम होता. अजित पवार गावातील विकासासंदर्भात बोलत होते. त्याच वेळी विद्यार्थ्यांना शाळेत जाण्यासाठी गाड्यांची सोय करावी असे एका कार्यकर्त्याने सांगितले.

 

Pune News : केतकी चितळेला चोपणार म्हणजे चोपणारच – रुपाली ठोंबरे

स्पष्टवक्ते असलेल्या अजित पवारांनी मिश्किल शब्दात या कार्यकर्त्याला प्रत्युत्तर दिले. होय बाबा सगळी सोय आम्हीच करायची. आता मी ड्रायव्हर म्हणून बसतो, पवार साहेबांना कंडक्टर करतो आणि सुप्रियाला म्हणतो तू तिकीट काढ असे म्हणत त्यांनी या कार्यकर्त्याची शाळा घेतली.

 

हाच धागा पुढे पकडून अजित पवारांनी (Ajit Pawar) पुन्हा एकदा आपल्या शैलीत उपस्थित गावकऱ्यांना सुनावलं. जांभळाच्या झाडाखाली बसून जांभूळ थोबाडात पडले पाहिजे त्याचे उदाहरण दिलं. परंतु असं असलं तरीही गावकऱ्यांच्या आणि कार्यकर्त्यांच्या मागण्या काही संपतच नव्हत्या.

 

कार्यकर्ते एकापाठोपाठ एक कामांची यादी अजित पवारांना समोर ठेवत होते. त्यानंतर पुन्हा एकदा अजित पवार यांनी कार्यकर्त्यांची शाळा घेतली. अजित पवारांचा हे रूप पाहून कार्यकर्त्यांमध्ये पुन्हा एकदा हशा पिकल्याचं यावेळी दिसून आले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.