Pune News : पुण्यात काँग्रेसकडून स्वातंत्र्यवीर सावरकरांचा पुन्हा अपमान; ‘माफीवीर’ नावाचे लावले फ्लेक्स

एमपीसी न्यूज : काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी (Pune News) स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्याबद्दल अपमानास्पद वक्तव्य केल्यानंतर पुण्यामध्ये सावरकरांच्या पुतळ्यासमोर काँग्रेस कार्यकर्त्याने माफीवीर नामक फ्लेक्स लावून स्वातंत्र्यवीर सावरकर यांचा अपमान केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. या फ्लेक्सची दखल भाजप कार्यकर्त्यांनी घेतल्यावर पोलिसांनी तात्काळ दखल घेत संबधित कार्यकर्त्यावर गुन्हा दाखल केला आहे. त्यामुळे पुण्यात आता वातावरण चांगलेच पेटले आहे.

Pune News : रिसॉर्ट बुक करायला गेला आणि गमावले एक लाख रुपये

सारसबागजवळ असलेल्या स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या (Pune News) पुतळ्यासमोर महाराष्ट्र युवक प्रदेश काँग्रेस सरचिटणीस रोहन सुरवसे याने माफीवीर नामक फ्लेक्स लावले. हे फ्लेक्स भाजपच्या कार्यकर्त्यांनी हटवून पोलीस स्टेशनमध्ये धाव घेतली. पोलीस अधिकाऱ्यांची भेट घेऊन कॉंग्रेसच्या कार्यकर्त्यांवर गुन्हे दाखल केले. स्वारगेट पोलिसांनी युवक प्रदेश काँग्रेस कार्यकर्त्यांच्या विरोधात 153, 504, 188 कलम अन्वये गुन्हा दाखल केला आहे.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.